बंदोबस्ताच्या ठिकाणीच पोलिसांना नाश्ता-जेवण

By admin | Published: May 16, 2016 05:12 AM2016-05-16T05:12:23+5:302016-05-16T05:12:23+5:30

पोलिसांची अन्नाअभावी होणारी आबाळ लक्षात घेऊन सातारा पोलिस दलाने अन्नपूर्णा व्हॅनची निर्मिती केली.

The breakfast at the place where the breakfast | बंदोबस्ताच्या ठिकाणीच पोलिसांना नाश्ता-जेवण

बंदोबस्ताच्या ठिकाणीच पोलिसांना नाश्ता-जेवण

Next

प्रगती जाधव-पाटील,

सातारा-अहोरात्र सेवा बजावताना पोलिसांची अन्नाअभावी होणारी आबाळ लक्षात घेऊन सातारा पोलिस दलाने अन्नपूर्णा व्हॅनची निर्मिती केली. यामुळे बंदोबस्ताच्या ठिकाणीच पोलिसांना ताजा आणि सकस नाष्टा, जेवण मिळू लागले आहे. पोलिसांचे आरोग्य राखण्यात या उपक्रमाचा मोठा हातभार लागत असल्याने ही योजना कोल्हापूर परिक्षेत्रात राबविण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात पोलिसांवर गुन्ह्यांपेक्षाही यात्रा, जत्रा, उत्सव आणि निवडणूक यांचा ताण असतो. बंदोबस्ताच्या ठिकाणी जेवण उशीर मिळते किंवा मिळतही नाही. याची दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पुढाकार घेतल्यानंतर अन्नपूर्णा व्हॅन सातारा पोलिसांत दाखल झाली.एकावेळी सुमारे सातशेहून अधिक पोलिसांच्या ताज्या जेवणाची सोय या व्हॅनमार्फत होत आहे. (प्रतिनिधी)
>अशी असते सोय : बंदोबस्तासाठी कोणत्या ठिकाणी किती कुमक जाणार याचे नियोजन ठरल्यानंतर व्हॅनमधील कर्मचाऱ्यांना त्याची माहिती दिली जाते. त्यानंतर आवश्यक शिदा घेऊन ही व्हॅन निघते. अनेकदा भाजी, दूध आणि अन्य जिन्नस यांची सोय मुक्कामाच्या गावाच्या ठिकाणी केली जाते. बंदोबस्ताच्या ठिकाणापासून सर्वांना जवळ पडेल, अशा मोकळ्या जागेवर ही व्हॅन उभी करण्यात येते.
>अशी झाली निर्मिती
सातारा पोलिस दलात असणारी अन्नपूर्णा व्हॅन सातारा पोलिस मोटर परिवहन विभागाच्या वतीने तयार करण्यात आली आहे. अत्याधुनिक किचनच्या सर्व सोयी या व्हॅनमध्ये आहेत. घरात असणाऱ्या किचनसारखीच याची रचना असून, किचन कट्टा, एक्झॉस्ट फॅन याच्यासह मॉड्युलर किचनची अंतर्गत रचना करण्यात आली आहे. सुरक्षिततेचा विचार करून फायर एस्ंिटगविशरही बसविण्यात आला आहे.
सात जणांची टीम
आहारात पुरेशी प्रथिने, लोह आदी योग्य प्रमाणात मिळावे यासाठी मुख्य कुक प्रयत्नशील असतो. त्याच्याबरोबर एक सहायक आणि ६ मदतनीस अशी टीम असते.

Web Title: The breakfast at the place where the breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.