Breaking: प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला अपघात; पोलीस व्हॅनची धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 09:44 PM2020-07-08T21:44:42+5:302020-07-08T22:12:38+5:30
विरोधी पक्षनेते राज्याच्या दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांनी कोरोना रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेणे आणि तेथील अनागोंदीवर आवाज उठविण्याचे काम करत आहेत.
जळगाव : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे जळगाव जिल्ह्यातील भालोद गावाकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातीलच पोलीस वाहन (एस्कॉर्ट कार) दरेकर यांच्या कारवर धडकले. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून दरेकर हे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनात बसून पुढील प्रवासासाठी रवाना झाले. हा अपघात जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नशिराबाद जवळ बुधवारी रात्री ८.४० वाजता झाला. या ताफ्यात दरेकर यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील दुसºया वाहनात होते.
देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर हे दोन दिवसीय दौऱ्यावर आले असून बुधवारी रात्री दोघेही जण जळगाव शहरात न थांबता जिल्ह्यातील भालोद येथे स्वतंत्र वाहनाने भाजपचे दिवंगत माजी खासदार तथा जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्याकडे व्दारदर्शनाला जात होते. जळगावपासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या नशिराबाद गावाजवळ ताफा पोहचला असताना दरेकर यांच्या वाहनाला पोलीस वाहनाचीच धडक बसली. यात कारचे नुकसान झाले असले तरी कोणालाही दुखापत झालेली नाही.
नाशिक आणि मालेगांवचा दौरा आटोपून आम्ही जळगावकडे जात असताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला किरकोळ अपघात झाला.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 8, 2020
स्वतः प्रवीण दरेकर आणि इतरही सर्वच जण सुरक्षित आहेत.
काळजी करण्यासारखे काहीही नाही.
अपघातानंतर दरेकर हे कारमधून उतरुन आमदार गिरीश महाजन यांच्या कारमध्ये बसले व पुढे रवाना झाले. याच ताफ्यात फडणवीस यांचेही वाहन होते. पावसामुळे एस्कॉर्ट कारचे ब्रेक कमी न लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातग्रस्त कार ताफ्यातच पुढे रवाना झाली. शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर व इतर अधिकारी व कर्मचारी दोन्ही नेत्यांच्या पायलेट वाहनात आहेत. फडणवीस व दरेकर हे गुरुवारी सकाळी जळगावातील कोरोना रुग्णालयास भेट देणार असून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाºयांसी चर्चा करणार आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबईकडून मोठा दिलासा! कोरोना रुग्ण दुपटीचा दर ४५ दिवसांवर
राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू लागला; मुंबईतील मृतांचा आकडा 5000 पार
शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय
ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी
पारनेरच्या पाच नगरसेवकांना अजित पवारांनी अखेर मिलिंद नार्वेकरांकडे सोपविले