Breaking: अखेर मंत्रालयातून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 05:18 PM2020-01-16T17:18:16+5:302020-01-16T17:20:04+5:30
गेल्या काही दिवसांपासून फडणवीस सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्यासरकारने अखेर आज अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
- सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची अखेर मुंबई येथे पदोन्नतीवर माहिती महासंचालक या पदावर बदली झाली आहे.
- सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची बदली झाली असून मिलिंद शंभरकर हे सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी झाले आहेत.
- जे मुखर्जी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मुंबई यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय मुंबई.
- एस ए तागडे, प्रधान सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग यांची बदली प्रधान सचिव वस्त्रोद्योग
- डॉ. के एच गोविंदराज प्रधान सचिव वस्त्रोद्योग यांची बदली अतिरिक्त महानगर आयुक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई
- बी वेणुगोपाल रेड्डी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ यांची बदली प्रधान सचिव वने
- राजीव जलोटा, आयुक्त विक्रीकर यांची बदली अपर मुख्य सचिव ग्रामविकास
- संजीव कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांची बदली आयुक्त विक्रीकर महाराष्ट्र राज्य मुंबई
- श्वेता सिंघल जिल्हाधिकारी सातारा यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे
- प्रवीण दराडे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांची बदली आयुक्त समाज कल्याण पुणे
- असीम कुमार गुप्ता प्रधान सचिव ग्रामविकास यांची बदली प्रधान सचिव ऊर्जा
- दीपक सिंगला आयुक्त मृद व जलसंधारण औरंगाबाद यांची नियुक्ती जिल्हाधिकारी गडचिरोली
- शैला ए विक्रीकर आयुक्त यांची बदली अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी, मुंबई
- शेखर सिंग जिल्हाधिकारी गडचिरोली यांची बदली जिल्हाधिकारी सातारा
- पी वेलरासू, सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची बदली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका