शिवमंदिरात प्रेमीयुगुलाचं विषप्राशन.. दोघांचीही प्रकृती चिंताजनक !

By admin | Published: May 31, 2016 08:59 PM2016-05-31T20:59:22+5:302016-05-31T21:01:56+5:30

येथील घाटाच्या दरीतील शिवमंदिरामध्ये प्रेमीयुगुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Breath of the love of love in the Shiva temple .. Both of them are worrisome! | शिवमंदिरात प्रेमीयुगुलाचं विषप्राशन.. दोघांचीही प्रकृती चिंताजनक !

शिवमंदिरात प्रेमीयुगुलाचं विषप्राशन.. दोघांचीही प्रकृती चिंताजनक !

Next

ऑनलाइन लोकमत

शामगाव (सातारा), दि.31 -  येथील घाटाच्या दरीतील शिवमंदिरामध्ये प्रेमीयुगुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित युवक व युवतीला उपचारार्थ कऱ्हाडच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शामगाव घाटातील दरीमध्ये प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिरात दररोज सकाळी भाविक दर्शनासाठी येतात. परिसरातील ग्रामस्थांसह मार्गावरून प्रवास करणारे प्रवासीही आवर्जून या मंदिराला भेट देतात. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शामगावातील एक नवदाम्पत्य देवदर्शनासाठी मंदिरात गेले होते. नवदाम्पत्यासोबत काही युवक व युवतीही होत्या. दाम्पत्य मंदिरात पोहोचले त्यावेळी त्याठिकाणी एक युवक व युवती बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
युवक मंदिराच्या शेडमध्ये तर युवती शेडमधून बाहेर काही अंतरावर पडली होती. दोघांच्याही तोंडातून फेस येत असल्याने त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मंदिरात आलेले नवदाम्पत्य व इतर युवकांनी याबाबतची माहिती मसूर पोलिसांना दिली. पोलिसही तातडीने त्याठिकाणी दाखल झाले.
त्यांनी त्या युवक व युवतीची प्राथमिक तपासणी केली असता ते बेशुद्ध असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांना उपचारार्थ तातडीने कऱ्हाडच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घाटातील मंदिरासमोर संबंधित युवकाची दुचाकी आढळली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबतची नोंद मसूर पोलिस दूरक्षेत्रात झाली आहे.
अल्पवयीन मुलगी दहावीची !
आत्महत्येचा प्रयत्न केलेली मुलगी अल्पवयीन असल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. संबंधित मुलीने दहावीची परीक्षा दिली आहे. सोमवारी सायंकाळी संबंधित युवक व ती मुलगी घरात कोणास काहीही न सांगता निघून गेले होते. नातेवाइक त्यांचा शोध घेत असतानाच मंगळवारी सकाळी त्या दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले.

Web Title: Breath of the love of love in the Shiva temple .. Both of them are worrisome!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.