लाच मागणाऱ्या लिपिकांना अटक

By admin | Published: August 8, 2015 01:35 AM2015-08-08T01:35:38+5:302015-08-08T01:35:38+5:30

येथील अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांना लाच मागितल्याप्रकरणी अटक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तहसील कार्यालयातील दोघा लिपिकांना शुक्रवारी सकाळी

Bribery clerks arrested | लाच मागणाऱ्या लिपिकांना अटक

लाच मागणाऱ्या लिपिकांना अटक

Next

मालेगाव (नाशिक) : येथील अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांना लाच मागितल्याप्रकरणी अटक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तहसील कार्यालयातील दोघा लिपिकांना शुक्रवारी सकाळी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.
त्यांच्यावर छावणी पोलिसांत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. सकाळी अकराच्या सुमारास येथील महसूल विभागाच्या तहसील कार्यालयातील जमाबंदी लिपिक परेश जायभावे व फौजदारी लिपिक ज्योतिराम शिंदे यांना एसीबीचे पोलीस निरीक्षक विजय चौरे यांच्या पथकाने ताब्यात घेतले.
तक्रारदाराने पासपोर्ट काढण्यासाठी तहसीलदारांकडे ८ जुलैला अर्ज केला होता. हा अर्ज रायजादे यांंच्याकडे आल्याने अर्जदाराने त्यांची भेट घेऊन तपासणी अहवाल लवकर देण्याची विनंती केली. त्यावर २० ते २५ हजार रुपये खर्च येणार असल्याचे सांगत ९ जुलैला कार्यालयात भेटण्यास रायजादे यांनी सांगितले. तक्रारदाराने त्याची धुळे एसीबीत तक्रार केली.
पथकाने ९ जुलैला पंचासमक्ष पडताळणी केली असता तक्रारीत सत्यता आढळल्याने दोघांविरोधात ९, १० व १३ जुलैला सापळा लावण्यात आला होता; मात्र दोघा लिपिकांना संशय आल्याने त्यांनी पैसे
न स्वीकारता पासपोर्ट पडताळणीची सर्व कागदपत्रे अर्जदाराला परत
केली. त्यावेळी रेकॉर्डिंग
केलेल्या संभाषणाच्या पुराव्यावरून एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bribery clerks arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.