नोटाबंदीनंतर लाचखोरी 35 टक्क्यांनी घटली
By admin | Published: January 2, 2017 10:59 AM2017-01-02T10:59:18+5:302017-01-02T11:01:23+5:30
राज्यात नोटाबंदी निर्णयानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर 2016 मधील लाच घेण्याचे प्रमाण 35 टक्क्यांनी घटले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - राज्यात नोटाबंदी निर्णयानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर 2016 मधील लाच घेण्याचे प्रमाण 35 टक्क्यांनी घटले आहे. 2015 साली नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात लाचखोरीचे 184 खटले एसीबीकडे नोंदवण्यात आले होते. तर 2016 मध्ये नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात 120 खटले दाखल झाले आहेत.
लाचलुचपत खात्याने 2016 मध्ये तब्बल 223 अधिकाऱ्यांविरोधात, 224 पोलिसांविरोधात, 109 पंचायत समिती अधिकारी, एमएमआरडीएचे 52 अधिकारी, मुंबई महापालिकेचे 50 आणि मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या 49 अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केले आहेत. भ्रष्ट अधिकारी स्वतः पैसे स्वीकारत नाहीत, तर मध्यस्थीमार्फत लाच घेतात, अशी माहिती मिळाल्याचे एसीबीने सांगितले .
दरम्यान दरवर्षीप्रमाणे राज्याच्या महसूल खात्यात यावर्षीही सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर भ्रष्टाचारामध्ये एमएमआरडीए, पोलीस, पंचायत समिती, मुंबई महापालिका शिक्षण विभागाचा क्रमांक लागतो.
राज्यात दाखल करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे खटले
पुणे 186
नाशिक 153
नागपूर 137
ठाणे 124
औरंगाबाद 116
अमरावती 110
नांदेड 104
मुंबई 66