लाचखोर पोलिस उपनिरीक्षक, चार पोलिस कॉन्स्टेबल गजाआड

By Admin | Published: July 6, 2014 07:39 PM2014-07-06T19:39:08+5:302014-07-06T23:28:06+5:30

एसीबी अधिकार्‍यांनी एका पोलिस उपनिरीक्षकासह चार पोलिस कर्मचार्‍यांना गजाआड केले.

Bribery police sub-inspector, four police constable Gazaad | लाचखोर पोलिस उपनिरीक्षक, चार पोलिस कॉन्स्टेबल गजाआड

लाचखोर पोलिस उपनिरीक्षक, चार पोलिस कॉन्स्टेबल गजाआड

googlenewsNext

अकोला: राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील ट्राफिक पॉईंटवरून तीन ट्रक सोडण्यासाठी ३३00 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकार्‍यांनी एका पोलिस उपनिरीक्षकासह चार पोलिस कर्मचार्‍यांना गजाआड केले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान करण्यात आली.
गुरुवारी रात्रीच्यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरून तीन ट्रक ओरिसा राज्यातील कटक येथून अहमदाबादकडे जात असताना, बाळापूरजवळील ट्राफिक पॉईंटवर महामार्ग पोलिसांनी अडविले. ट्रक सोडण्यासाठी एका ट्रकमागे ११00 रुपये असे तीन ट्रकसाठी ३३00 रुपयांची मागणी त्यांनी केली. पहिल्या ट्रकचालकाने आमचे आणखी दोन ट्रक येत आहेत. त्यांच्याकडून पैसे घ्या, असे पहिल्या ट्रकचालकाने सांगितले. त्यामुळे महामार्ग वाहतूक पोलिसांनी पहिला ट्रक सोडून दिला. त्यानंतर दोन ट्रक आले. त्यांना पैशांची मागणी करण्यात आली. ट्रकचालक व पोलिसांमध्ये ३३00 रुपये देण्याची तडजोडसुद्धा झाली; परंतु ट्रकमध्ये काही प्रवासी असल्याने महामार्ग पोलिसांनी कलम ६६/१९२ नुसार कारवाई करण्याची धमकी दिली आणि ही कारवाई टाळण्यासाठीसुद्धा पैशांची मागणी केली. अखेर ट्रकचालकांनी एसीबीकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक उत्तम जाधव, पोलिस निरीक्षक यू. ए. जाधव यांच्या मार्गदर्शनात सापळा रचण्यात आला; परंतु महामार्ग पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पैसे घेतले नाहीत; परंतु पैशाची मागणी केल्याप्रकरणी महामार्ग वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक एस.टी. बावस्कर, पोलिस कॉन्स्टेबल सुमेरसिंह राजपूत, गजानन चांभारे, रफिक शेख आणि मोहन वानखडे या पाच जणांना अटक केली.

** अशी केली कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार झाल्यानंतर एसीबीचे अधिकारी व कर्मचारी दोन ट्रकमध्ये प्रवासी म्हणून बसून गेले. बाळापूरजवळील ट्राफिक पॉईंटवर ट्रक अडविल्यानंतर महामार्गावर तैनात पीएसआय एस.टी. बावस्कर व त्यांच्या ४ कर्मचार्‍यांनी ट्रकचालकांना लाचेची मागणी केली. त्यानंतर ट्रकची पाहणी केली असता त्यांना ट्रकमध्ये काही प्रवासी दिसले. पोलिसांनी ट्रकमध्ये प्रवासी वाहतूक करण्यास प्रतिबंध असल्याने ट्रकचालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आणि ही कारवाई टाळण्यासाठी पुन्हा लाचेची मागणी केली. अखेर प्रवासी बनलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचारी ट्रकबाहेर आल्यावर पीएसआय बावस्कर व कर्मचार्‍यांची बोबडी वळली.

Web Title: Bribery police sub-inspector, four police constable Gazaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.