लाचखोरीची लाट! कारवाईचा खान्देशभर तडाखा
By admin | Published: May 14, 2014 12:31 AM2014-05-14T00:31:47+5:302014-05-14T00:31:47+5:30
शासकीय कामांसाठी लाच घेणार्या नायब तहसीलदार, वीज अभियंता, जलसंधारण खात्याच्या उपविभागीय अधिकार्यासह पाच खादाडांना आज लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याच्या पथकांनी रंगेहाथ पकडले.
लाचखोरीची लाट! कारवाईचा खान्देशभर तडाखा
जळगाव/धुळे/तळोदा : शासकीय कामांसाठी लाच घेणार्या नायब तहसीलदार, वीज अभियंता, जलसंधारण खात्याच्या उपविभागीय अधिकार्यासह पाच खादाडांना आज लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याच्या पथकांनी रंगेहाथ पकडले. वीज अभियंत्याला ‘शॉक’ सातपुड्याच्या दुुर्गम पाड्यांना वीजपुरवठा मिळावा या शिफारस पत्रासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. वीज वितरण कंपनीच्या तळोदा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता आशिष मनोहर गायकवाड व पिंपळखुंटा ता. अक्कलकुवा उपकेंद्राचे आॅपरेटर अजितसिंग कुबेरसिंग इंगळे अशी या लाचखोर आरोपींची नावे आहेत. गमण येथील जिल्हा परिषद सदस्य किरसिंग हुण्या वसावे यांनी वीज कंपनीकडे अर्ज केलेला आहे. कनिष्ठ अभियंता आशिष गायकवाड यांची शिफारस हवी होती. यासाठी गायकवाड यांनी, किरसिंग वसावे यांच्याकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही बाब वसावे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयास कळविली. सापळा रचल्यावर आॅपरेटर अजितसिंग याने लाच स्वीकारून कनिष्ठ अभियंता गायकवाड यांच्याकडे दिली. तेव्हा पथकाने दोघांना अटक केली. पोलीस उपअधीक्षक अनिल वडनेरे व सहकार्यांनी ही कारवाई केली. धुळ्यात दोघे सापडले रूदावली, ता.शिरपूरच्या नवीन शर्तीच्या कूळवहिवाटीच्या जमिनीची सौदा पावती व करारनामा करून खरेदी केली होती. या जमिनीच्या खरेदी विक्रीची परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कूळवहिवाट शाखेत प्रस्ताव सादर केला होता. या शाखेचे नायब तहसीलदार सुभाष दीक्षित व अव्वल कारकून हिलाल सोनवणे यांनी परवानगी मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे दीड लाखाची लाच मागितली. त्यांनी सरळ अॅन्टीकरप्शन विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी कूळवहिवाट शाखेत दीक्षित व सोनवणे यांना एक लाखाची लाच घेताना पथकाने पकडले. या दोन संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. अडीच लाखांची रोकड जप्त दीक्षित यांच्या कार्यालयातील कपाटातून एक लाख ४२ हजार ६०० रूपयांची रोकड जप्त केली. जलसंधारण हादरले निंभोरा व धार ता.धरणगाव येथील बंधार्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लघुसिंचन (जलसंधारण) विभागाचे उपविभागीय अधिकारी सुरेश एकनाथ शिंपी यांना अटक केली.