मीनाकारी, एम्बॉसिंग पणत्यांची लखलख तेजाची दुनिया

By Admin | Published: October 19, 2016 04:14 AM2016-10-19T04:14:34+5:302016-10-19T04:14:34+5:30

रंगीबेरंगी आकर्षक पणत्यांनी ठाण्याच्या बाजारपेठा सजू लागल्या आहेत.

The brightest world of energetic, embossing deities | मीनाकारी, एम्बॉसिंग पणत्यांची लखलख तेजाची दुनिया

मीनाकारी, एम्बॉसिंग पणत्यांची लखलख तेजाची दुनिया

googlenewsNext

प्रज्ञा म्हात्रे,

ठाणे- रंगीबेरंगी आकर्षक पणत्यांनी ठाण्याच्या बाजारपेठा सजू लागल्या आहेत. नवनवीन पणत्या, दिवे खरेदी करण्याकडे ठाणेकरांचा कल असल्याने यंदा मीनाकारी वर्क केलेल्या, गोल्ड प्लेटेड पणत्या बाजारात आल्या आहेत. हे दिवे ठाणेकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत.
यंदा मातीच्या पणत्या कमी दिसत असल्या तरी फ्लोटींग दिवे, शॅडो दिवे, लटकणारे दिवे, कॅण्डल स्टॅण्ड यांची चलती आहे. शॅडो दिवा हा एक वेगळा प्रकार विक्रीसाठी आला आहे. मेणाचा दिवा आणि त्यामागे गणपती, लक्ष्मी, स्वस्तीक, ओम यांची गोल्ड प्लेटेड मूर्ती आहे. हा दिवा पेटवल्यावर भिंतीवर या देवादिकांच्या मूर्तींची सावली दिसते. १४० रुपये या दिव्याची किंमत आहे. घरातील सजावटीसाठी लाकडापासून बनवलेली कोयरीच्या आकाराची पणती उपलब्ध आहे. वेगवेगळ््या रंगांच्या मण्यांनी ही पणती सजवली आहे. यात फुलेही ठेवू शकता, असे गाला यांनी सांगितले. ५३० रुपये अशी या पणतीची किंमत आहे. फ्लोटींग पणत्यांची क्रेझ कायम आहे. यात कॅण्डलवाली फ्लोटींग पणती आणि बॅटरीवर चालणारी फ्लोटींग पणती, असे दोन प्रकार आहेत. कॅण्डलची फ्लोटींग पणती ही १८० रुपये तर बॅटीरवर चालणारी फ्लोटींग पणती २२० रुपयांने मिळते. यात २५ प्रकार उपलब्ध आहेत. कॅण्डल स्टॅण्ड सेटही विक्रीसाठी आहे. लाकडाचे हे स्टॅण्ड असून त्यावर वेगवेगळे वर्क केले आहेत. नारळाच्या करवंटीमध्ये असलेले फ्लोटींग दिवे देखील लक्ष वेधून घेत आहे. ११० रुपये अशी या दिव्याची किंमत आहे.
यंदा पाऊस लांबल्याने मातीच्या पणती कमी प्रमाणात आल्या आहेत. दिवाळीपर्यंत किती येतील याचाही अंदाज नाही. त्या बनवून सुकवणे मग त्यावर रंगकाम करणे याला बराच कलावधी लागत असल्याने मातीच्या पणतींमध्ये नाविन्य किती असेल हे आता सांगू शकत नाही, असे विक्रेत्यांनी सांगितले. यंदा चिनी मातीच्या पणत्या विक्रीसाठी आणणार नसल्याची भूमिका बाजारपेठेतील काही विक्रेत्यांनी घेतली आहे.
बाजारात रंगीबेरंगी आणि आकर्षक पणत्या आल्या असल्या तरी काही हौशी महिला, तरुणी घरी मातीच्या पणत्या नेऊन त्या आपल्या कल्पकतेने सजवतात. सध्या हा ट्रेण्ड वाढत आहे. आपण सजवलेली पणती दारात लावण्याचा वेगळाच आनंद मिळत असल्याने अनेक महिला हा पर्याय निवडत आहेत. पंचमुखी, कोयरी, गोल पणत्याही ठाणेकर रंगकामासाठी घेऊन जातात, असे माणिक शहा यांनी सांगितले. रंगवल्यावर या एका पणतीची किंमत ४० रुपये होते. मी हौस म्हणून पणत्या सजवते. आॅर्डरनुसारही सजवून देते. एम्बॉसिंग पणत्यांना, मोर, स्टोन, फुलांचा इफेक्ट देऊन पणत्या सजवते, असे पूजा धुरी यांना सांगितले.
>एम्बॉसिंगच्या पणत्या
अ‍ॅक्रॅलिक, फॅब्रिक कलरप्रमाणे सध्या एम्बॉसिंगने रंगविलेल्या पणत्यांची चलती आहे. हौशी महिला किंवा तरुणी सध्या या प्रकारच्या पणत्या तयार करण्यात गुंतल्या आहेत. एम्बॉसिंग पणती रंगविण्याचे टेक्निक वेगळे आहे. त्यामुळे या पणत्यांचे दर जास्त आहेत. एम्बॉसिंग हे पावडर स्वरुपात असल्याने पणतींवर वापरताना थिनरमध्ये मिश्रण करुनच वापरले जाते. काहीजण पणतीला आधी फॅब्रिक कलर देऊन मग त्यावर एम्बॉसिंग वापरतात. त्यामुळे पणतीला इफेक्ट चांगला येतो. एम्बॉसिंग पणती उठावदार असल्याने ती जास्त सजविण्याची गरज नसते असे पूजाने सांगितले.

Web Title: The brightest world of energetic, embossing deities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.