कोनाळे केमिस्ट्री क्लासेसचे उज्ज्वल यश
By Admin | Published: July 15, 2017 04:57 AM2017-07-15T04:57:05+5:302017-07-15T04:57:05+5:30
प्रा. व्ही.डी. कोनाळे यांच्या कोनाळे केमिस्ट्री क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी नीट-२०१७मध्ये उतुंग भरारी घेतली
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : येथील प्रा. व्ही.डी. कोनाळे यांच्या कोनाळे केमिस्ट्री क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी नीट-२०१७मध्ये उतुंग भरारी घेतली. नीटमध्ये आँचल अतुल काबरा ही ७२०पैकी ६६३ गुण घेऊन मराठवाड्यात प्रथम आली. तिला केमिस्ट्रीत १४६ गुण मिळाले. तर राम ढोरे हा १८०पैकी १६६ गुण घेऊन केमिस्ट्रीत सर्वप्रथम आला. त्याला ‘नीट’मध्ये ५६० गुण मिळाले. स्वप्निल वसंतराव घुगे १६२ गुण मिळवून दुसरा तर १६० गुण मिळवत गजश्री गुट्टे व प्रवीणकुमार मुंडे याने तृतीय क्रमांक पटकावला.
या राष्ट्रीय स्तरावरच्या वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत कोनाळे क्लासेसचा विद्यार्थी यश पुरुषोत्तम दाड ६२४ गुण घेऊन क्लासेसमध्ये द्वितीय आला. अमेया देगलूरकर (६०७ गुण), अमेय दिलीप कुंद्रावार (६०५), गजश्री गणेश गुट्टे (६०४), अरफद मोहम्मद गनियानी (६०२), पुंडलिक मस्के (५९०), प्रवीणकुमार मुंडे (५८६), जान्हवी शिंदे आणि शेख मुजाहद इकबाल (५७८), श्वेता कदम (५७७), ईश्वर पुरजवार (५७५ गुण) यांनी नीटमध्ये यश प्राप्त केले.
मेडिकल व अभियांत्रिकी प्रवेशासाठी कोनाळे केमिस्ट्री क्लासेसचे गेल्या दोन दशकांत हजारो विद्यार्थी पात्र ठरले आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या केमिस्ट्री विषयाचे अत्यंत सखोल पद्धतीने प्रा. व्ही.डी. कोनाळे मार्गदर्शन करतात.
‘नीट’मध्ये १००पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५३७ च्या पुढे आहे. शिवम् रावळे (१५७ गुण), अमेय कुंद्रावार, श्वेता कदम, साईप्रसाद मानकरी (१५५), अमेया देगलूरकर, आवेज चोईन (१५२), बाबूराव भुतनर, शर्मिला कार्लेकर (१५०), अनिरुद्ध पोटकर, मोहिनी श्रृंगारे (१४७), यश दाड, गिरेश भुसारी, मयूरी बोकारे, मयूरेश्वर जाधव, ज्ञानोबा रायमाले (१४६), स्नेहा मुकदम, गिरीश बजाज, हरिश सोनटक्के (१४५) यांनी केमिस्ट्री विषयात गुण प्राप्त केले. (वा. प्र.)