गोहत्याबंदीचा कायदा आणू - सुब्रह्मण्यम स्वामी

By admin | Published: June 19, 2017 02:45 AM2017-06-19T02:45:31+5:302017-06-19T02:45:31+5:30

देशात गोहत्याबंदीचा सक्षम कायदा आणण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकार येत्या दोन वर्षांत अशा प्रकारचा कायदा आणेल, अशी माहिती भाजपा नेते, खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी रविवारी दिली.

To bring law for cow slaughter - Subrahmanyam Swami | गोहत्याबंदीचा कायदा आणू - सुब्रह्मण्यम स्वामी

गोहत्याबंदीचा कायदा आणू - सुब्रह्मण्यम स्वामी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशात गोहत्याबंदीचा सक्षम कायदा आणण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकार येत्या दोन वर्षांत अशा प्रकारचा कायदा आणेल, अशी माहिती भाजपा नेते, खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी रविवारी दिली.
विराट हिंदुस्थान संघम, मुंबई स्टॉक एक्स्चेंज आणि इस्कॉनने ‘भारतीय गायीं’वर आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत सुब्रह्मण्यम स्वामी बोलत होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह अन्य मान्यवर या परिषदेस उपस्थित होते. गोरक्षण म्हणजे मानसिक गुलामगिरीतून मुक्तता असल्याचे प्रतिपादन स्वामी यांनी यावेळी केले. गायीचे मांस खाणे हा इस्लामचा मूलभूत घटक नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोहत्याबंदीचा कायदा करण्यात कसलीच अडचण नाही. गोरक्षणाच्या नावाखाली मागील काळात जो हिंसाचार झाला तो गुंडांनी घडवून आणला होता, असा दावा करतानाच गोरक्षक योग्य पद्धतीने आपले काम करीत आहेत. त्यांचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी त्यांना ओळखपत्र देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गोरक्षकांच्या आडून भविष्यात कोणीही रस्त्यावर हिंसाचार व अडवणूक करू शकणार नाही, असे स्वामी म्हणाले.
काँग्रेस सरकारने आपल्या कार्यकाळात विविध प्रकारचे अनुदान देत गोमांस निर्यातीला प्रोत्साहन देण्याचा सपाटा लावला होता. भाजपाची सत्ता आल्यापासून गोमांस निर्यातीला चाप लावण्याचे काम सुरू आहे. गोमांस निर्यातीला उत्तेजन देणाऱ्या १३ अनुदान योजना भाजपा सरकारने आपल्या कार्यकाळात बंद केल्या आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे गोमांस निर्यातीला मोठ्या प्रमाणावर आळा बसल्याचेही स्वामी यांनी या वेळी सांगितले. गोरक्षण, गोसंवर्धन आदीसाठी एका विशेष अ‍ॅपचेही या वेळी स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Web Title: To bring law for cow slaughter - Subrahmanyam Swami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.