शिंगणापूरचा वाद मिटविण्यासाठी श्री श्री रविशंकर यांना साकडे
By admin | Published: January 31, 2016 01:33 AM2016-01-31T01:33:22+5:302016-01-31T01:33:22+5:30
शिंगणापूरला चौथऱ्यावर चढून महिलांना शनिदर्शन मिळावे, यावरून सुरू झालेला वाद मिटविण्यासाठी श्री श्री रविशंकर यांना साकडे घालण्यात आले आहे. नेवाशाचे माजी
अहमदनगर : शिंगणापूरला चौथऱ्यावर चढून महिलांना शनिदर्शन मिळावे, यावरून सुरू झालेला वाद मिटविण्यासाठी श्री श्री रविशंकर यांना साकडे घालण्यात आले आहे. नेवाशाचे माजी आ. शंकरराव गडाख यांनी शुक्रवारी बंगळुरूला जाऊन श्री श्रींची भेट घेऊन त्यांना विषयाची सविस्तर माहिती दिली.
उपरोक्त विषयावर मार्ग सुचवण्याची त्यांना विनंती केली आहे. त्यानुसार श्री श्रींनी ७ फेबु्रवारीला शिंगणापूरला येण्याचे मान्य केले असून सर्वांशी चर्चा करून मार्ग काढण्यास सहमती दिली आहे. त्यामुळे ७ तारखेला वादावर निर्णायक तोडगा निघण्याची शक्यता आहे. दर्शनाचा मुद्दा संवेदनशील बनल्याने त्यातून संयमाने मार्ग काढणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी गडाख यांनी श्री श्रींना शिंगणापूरची परंपरा, प्रथेची सविस्तर माहिती दिली. (प्रतिनिधी)