ब्रिटनचे जर्सी बेट १० तासांत पार

By admin | Published: August 24, 2015 01:16 AM2015-08-24T01:16:05+5:302015-08-24T01:16:05+5:30

नेरूळमध्ये राहणारा प्रभात कोळी (१५) या जलतरणपटूने ब्रिटनमध्ये नवी मुंबई शहराचे नाव उंचावले. १९ आॅगस्ट रोजी इंग्लंड शहरात झालेल्या जलक्रीडा

Britain's Jersey Island crosses 10 hours | ब्रिटनचे जर्सी बेट १० तासांत पार

ब्रिटनचे जर्सी बेट १० तासांत पार

Next

नवी मुबई : नेरूळमध्ये राहणारा प्रभात कोळी (१५) या जलतरणपटूने ब्रिटनमध्ये नवी मुंबई शहराचे नाव उंचावले. १९ आॅगस्ट रोजी इंग्लंड शहरात झालेल्या जलक्रीडा स्पर्धेत सलग १० तास पोहून त्याने जर्सी बेट पार केले. हे ६४ किमी अंतर पार करण्यासाठी त्याला १० तास ११ मिनीटे लागली. जर्सी बेट पार
करणारा तो पहिला अशियायी जलतरणपटू ठरला. प्रभातने खुल्या गटात चौथा क्रमांक मिळविला असून, लहान गटात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले.
जोरदार वारा, उंच लाटा, भरतीच्या प्रवाहाच्या बदलत्या दिशा, पाण्यात मोठ्या प्रमाणात असलेले जेली फिश आणि १६ डिग्री तापमान ही सारी आव्हाने पेलत मोठ्या जिद्दीने क्षणभरही विश्रांती न घेता प्रभातने हे अंतर पार केले. यावेळी जेली फिशने अनेकदा दंश करूनही प्रभातने न डगमगता प्रवास कायम ठेवला. यावेळी ‘जर्सी लॉँग डिस्टन्स आॅफ स्विमिंग क्लब’च्या सदस्यांनीही प्रभातचे कौतुक केले.

Web Title: Britain's Jersey Island crosses 10 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.