अकोला सराफा बाजारातील ब्रिटीशकालीन इमारत कोसळली, जीवितहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2017 01:25 PM2017-07-02T13:25:54+5:302017-07-02T14:00:20+5:30
शहरातील सराफा बाजारातील ब्रिटीशकालीन इमारतीचा काही भाग रविवारी सकाळी अचानकपणे कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Next
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 2 - शहरातील सराफा बाजारातील ब्रिटीशकालीन इमारतीचा काही भाग रविवारी सकाळी अचानकपणे कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारतीच्या मालकास महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली असून, धोकादायक इमारत पूर्णत: पाडून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
शहरातील सराफा बाजारा, किराणा बाजार, कोठडी बाजारामध्ये अनेक ब्रिटिशकालीन इमारती जीर्ण अवस्थेत उभ्या आहेत. या इमारती धोकादायक ठरत असून, पावसाळ्यामध्ये अनेकदा या इमारतींचे जीर्ण झालेले भाग कोसळतात. गतवर्षी सुद्धा पावसाळ्यात किराणा बाजारात एक इमारत कोसळली होती. यात एक युवक व त्याची आई गंभीर जखमी झाले होते. यंदा पावसाळ्यात सराफा बाजारातील ब्रिटिशकालीन इमारतीचा अर्धा भाग रविवारी सकाळी अचानकपणे कोळसला. सुदैवाने बाजारात नागरीकांची वर्दळ नसल्याने कोणतीही जीवितहानी घडली नाही. इमारतीमध्ये सुद्धा कोणी राहात नव्हते. ही इमारत दीडशे वर्षांपूर्वी बांधलेली आहे. इमारत ठिकठिकाणी जीर्ण झाली आहे. शनिवारी सायंकाळपासून पावसाला रिपरिप सुरूवात झाली होती. त्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळला. महापालिका प्रशासनाने ही धोकादायक इमारत तातडीने पाडून टाकण्याचे आदेश इमारत मालकाला दिले आहेत.