ब्रिटिशांचा डाव हाणून पाडला
By Admin | Published: November 2, 2016 12:59 AM2016-11-02T00:59:20+5:302016-11-02T00:59:20+5:30
५०० हून अधिक संस्थानिकांना कोणत्याही देशात सामील होण्याचे वा स्वतंत्र राहण्याची तरतूद करून खरे म्हणजे भारताचे शेकडो तुकडे होतील, अशी व्यवस्था केली होती.
पुणे : ब्रिटिशांनी भारताची केवळ भारत आणि पाकिस्तान अशी विभागणी केली नव्हती, तर ५०० हून अधिक संस्थानिकांना कोणत्याही देशात सामील होण्याचे वा स्वतंत्र राहण्याची तरतूद करून खरे म्हणजे भारताचे शेकडो तुकडे होतील, अशी व्यवस्था केली होती. हा कुटिल डाव जर उधळवून देशाला एकसंघ बनवण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले, असे गौरवोद्गार मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
एकतादिनाच्या निमित्ताने पुणे शहर भाजपाच्या वतीने काढण्यात आलेल्या एकता रॅलीच्या समारोप प्रसंगी जावडेकर बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, सरचिटणीस मुरली मोहोळ, दीपक मिसाळ, गणेश घोष उपस्थित होते. जावडेकर म्हणाले, ‘‘कॉँग्रेसने फक्त एकाच घराण्याचे अखंड कौतुक चालू ठेवले. सरदार पटेल, लालबहादूर शास्त्री, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आदींना अंधारात ठेवण्याचे पाप केले आहे. मोदी सरकार स्वातंत्र्य लढ्यातील सर्व सेनानींना त्यांचे योग्य स्थान देऊ इच्छिते. पटेल आणि
सर्वच स्वतंत्रता सेनानींच्या गाथांना शालेय अभ्यासक्रमात योग्य स्थान देण्यात येईल. (प्रतिनिधी)