मुंबईतील राजभवनात सापडल्या ब्रिटिशकालीन तोफा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 11:56 PM2018-11-03T23:56:59+5:302018-11-04T04:35:32+5:30
महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवनामध्ये अजून एक ऐतिहासिक ठेवा सापडला आहे.
मुंबई - महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवनामध्ये अजून एक ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. राजभवनातील जमिनीखाली दोन ब्रिटिशकालीन तोफा सापडल्या आहेत. सुमारे 22 टन वजनाच्या या महाकाय तोफा क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या आहेत.
राज्यपाल विद्यासागर राव यांनी या तोफा जमिनीतून बाहेर काढण्याच्या कामाची पाहणी केली. तसेच या तोफांबाबत अधिक माहिती घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. सध्या या तोफा राजभवनातील आवारात ठेवण्यात आल्या आहेत. याआधी राजभवनामध्ये एक ब्रिटिशकालीन बंकर आढळला होता.
Maharashtra: Two identical British era cannons weighing 22 tonnes each found in Raj Bhavan in Mumbai earlier today. Maharashtra Governor Chennamaneni Vidyasagar Rao was present at the cannon lifting operation and ordered conservation & restoration of the cannons. pic.twitter.com/lG4YwZLvVL
— ANI (@ANI) November 3, 2018
मुंबई : राजभवन येथे प्रत्येकी २२ टन वजनाच्या दोन ब्रिटीशकालीन तोफा सापडल्या असून शनिवारी दोन्ही तोफा क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या. त्या अनेक दशके दुर्लक्षित अवस्थेत मातीखाली दबून होत्या. राज्यपाल विद्यासागर राव यांनी संध्याकाळी तोफा उचलण्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे परिरक्षण करण्याची सूचना केली आहे.
राज्यपालांनी नौदलाच्या तज्ज्ञांची मदत घेऊन तोफांची तांत्रिक माहिती घेण्याचे तसेच त्यांचे जुने अभिलेख असल्यास तपासण्याची सूचना राजभवनच्या अधिकाऱ्यांना केली आहे.या जुळ्या तोफा राजभवनातील जल विहार (बँक्वे हॉल) हॉलच्या समोर दर्शनी भागात ठेवण्याची देखील राज्यपालांनी सूचना केली आहे. त्यामुळे त्या पाहता येणार आहेत.