भाऊ, तुझे 'जॅकेट' कोणते?
By admin | Published: December 9, 2014 02:31 AM2014-12-09T02:31:04+5:302014-12-09T12:32:55+5:30
केंद्र अन् राज्यातील सत्ताबदलानंतर देशाप्रमाणोच राज्यातील राजकारण्यांच्या पेहरावावरदेखील नरेंद्र अन् देवेंद्र ‘इफेक्ट’ दिसायला लागला आहे.
Next
मोदी की नेहरू? : विधिमंडळात रंगतेय ‘जॅकेट’कारण
योगेश पांडे - नागपूर
केंद्र अन् राज्यातील सत्ताबदलानंतर देशाप्रमाणोच राज्यातील राजकारण्यांच्या पेहरावावरदेखील नरेंद्र अन् देवेंद्र ‘इफेक्ट’ दिसायला लागला आहे. राजकारण म्हटले की खादीचे कपडे हे कॉमन समीकरण आह़े त्यातही विधिमंडळ अधिवेशन असेल तर असे ज्ॉकेट घालणा:यांची जणू जत्रच भरत़े परंतु यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आमदारांच्याच नाही तर कार्यकत्र्याच्याही ‘फॅशन स्टेटमेन्ट’मध्ये बदल दिसून येत असून रंगीबेरंगी ‘जॅकेट’ची नवीनच फॅशन आली आहे. राजकारणाच्या आखाडय़ात ‘जॅकेट’च्या या ‘फॅशन’वरही भिन्न राजकीय विचारधारांचा प्रभाव जाणवत असून कुणी या जॅकेटला ‘मोदी जॅकेट’ तर कुणी ‘नेहरू जॅकेट’ संबोधत आहेत. विशेष म्हणजे, यावरून आमदारांमध्ये चक्क दावे-प्रतिदावे होत असल्याचे चित्र आहे.
ऐन गुलाबी थंडीत होणा:या हिवाळी अधिवेशनाची राज्यभरातील आमदारांना ओढ असतेच. थंडीमुळे अनेक आमदार निरनिराळ्या प्रकारचे ‘जॅकेट’ किंवा हाफ बाह्यांचे स्वेटरमध्ये दिसून येतात. परंतु यंदाच्या अधिवेशनात मात्र ‘जॅकेट’ घालणा:यांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. राज्यातील नवनियुक्त सरकारच्या स्थापनेनंतर उपराजधानीत पहिल्यांदाच होत असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अनेक नवीन चेहरे दिसत आहेत. काळ्या किंवा राखडी रंगासोबतच निळे, जांभळे, गुलाबी, लाल तसेच हिरव्या रंगाचे ‘जॅकेट्स’ घातलेले आमदार एकामागोमाग एक विधिमंडळात प्रवेश करीत होते. केवळ सत्तापक्षच नव्हे तर विरोधी आमदारांचादेखील यात मोठय़ा प्रमाणावर समावेश होता.
परंतु अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या ‘ज्ॉकेट’वरूनच राजकारण रंगल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाचा हा करिष्मा असून यामुळे व्यक्तिमत्त्वातील रुबाब आणखी वाढतो असे मत सत्तापक्षातील आमदारांनी व्यक्त केले. शिवाय पंतप्रधानांप्रमाणोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जॅकेट्स’चीदेखील चांगलीच चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी सुसंगत असा ‘लुक’ धारण करणा:यांची संख्या वाढीस लागली आहे. दुसरीकडे कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदार मात्र सत्तापक्षाच्या आमदारांचा दावा खोडून काढत आहेत. असे ‘जॅकेट्स’ देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे घालायचे व याला ‘नेहरू जॅकेट’ असे म्हणतात. याला कोणी इतर नाव देण्याचा प्रयत्न करू नये असे उत्तर विरोधी आमदारांकडून देण्यात येत आहे.
धिस इज नेहरू जॅकेट
विधिमंडळ परिसरात ‘तुम्ही कोणते जॅकेट घातले?’ अशी आमदारांना अनेकांकडून विचारणा करण्यात येत होती. ‘जॅकेट’च्या या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘आयडियाची कल्पना’ लढवली. आकाशी रंगाच्या ‘जॅकेट’वर त्यांनी चक्क ‘धिस इज नेहरू जॅकेट’ असे लिहून आणले अन् कोणाला प्रश्न विचारण्याची संधीच दिली नाही.