शेजा-याचा महिलेवर पाशवी बलात्कार
By admin | Published: October 24, 2016 10:11 PM2016-10-24T22:11:56+5:302016-10-24T22:11:56+5:30
शेजारी राहणा-या एका आरोपीने विवाहित महिलेच्या (वय ३०) बाथरूममध्ये शिरून तिच्यावर पाशवी अत्याचार केला. तिने आरडाओरड अथवा प्रतिकार करू नये म्हणून आरोपीने पीडित महिलेच्या तोंडावर टॉवेल बांधला. तर,
Next
dir="ltr">
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 24 - शेजारी राहणा-या एका आरोपीने विवाहित महिलेच्या (वय ३०) बाथरूममध्ये शिरून तिच्यावर पाशवी अत्याचार केला. तिने आरडाओरड अथवा प्रतिकार करू नये म्हणून आरोपीने पीडित महिलेच्या तोंडावर टॉवेल बांधला. तर, तिच्याच साडीच्या पदराने तिचे हात बांधून कुकर्म केले. रविवारी पहाटे एमआयडीसीत ही खळबळजनक घटना घडली. मात्र, बदनामीच्या धाकामुळे पीडित परिवाराने ३६ तासानंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
शिवकुमार विश्वकर्मा (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे. तो एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. त्याच्या शेजारीच पीडित महिलेचे घर आहे. तेथे ती, पती, मुलगा, मुलगी आणि सास-यासह राहते. ती आणि तिचा पती एमआयडीसीतील एका कंपनीत सकाळीच कामाला जातात. त्यामुळे ती पहाटे उठून जेवणाचे डबे बनविते. नेहमीप्रमाणे रविवारी पहाटे ५.१५ ला ती घराबाहेर असलेल्या स्रानगृहात गेली. यावेळी आरोपी त्याच्या घराच्या टेरेसवर फिरत होता. महिला आंघोळीच्या तयारीत असताना दाराची कुंडी उघडून तो स्रानगृहात शिरला आणि त्याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. तिने आरडाओरड करू नये म्हणून आरोपीने तिच्या तोंडाला टॉवेल बांधला. तर, प्रतिकार करीत असल्याचे पाहून तिच्याच साडीने तिचे हात बांधले. दरम्यान, बराच वेळेपासून सून बाहेर गेली. मात्र, परत न आल्याचे लक्षात आल्याने सासरा स्रानगृहासमोर आला अन् त्याला नको ते दृष्य दिसले. त्यानंतर सास-याने आरोपीला शिवीगाळ केली तेव्हा आरोपी पळून गेला.
३६ तासानंतर गुन्हा दाखल -
या घटनेमुळे पीडित महिलेच्या संपूर्ण परिवाराला जबर मानसिक धक्का बसला. पोलिसांकडे गेल्यास बदनामी होईल, या धाकापोटी त्यांनी दिवसभर गप्प राहणे पसंत केले. मात्र, गप्प राहिल्यास आरोपी निर्ढावेल आणि त्याच्याकडून पुन्हा असाच प्रकार घडू शकतो, हे लक्षात आल्यामुळे पीडित महिलेच्या पती आणि सास-याने तिला सोमवारी दुपारी पोलीस ठाण्यात नेले. तेथे तिने नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास शिवकुमार विश्वकर्माविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक पी. एम. काळे यांनी रात्री ९ वाजता आरोपीला अटक केली.