सिल्लोडमध्ये बोकडांचा बाजार तेजीत

By Admin | Published: September 7, 2016 07:33 PM2016-09-07T19:33:40+5:302016-09-07T19:33:40+5:30

बकरी ईद तोंडावर आल्याने कुर्बानीमुळे बोकड, मेंढा, शेळी-मेंढीची मागणी प्रचंड वाढलेली असून, या बाजारात जाफरानी बकरा ५१ हजारांत विकला गेला.

The bucks market rally in Sillod | सिल्लोडमध्ये बोकडांचा बाजार तेजीत

सिल्लोडमध्ये बोकडांचा बाजार तेजीत

googlenewsNext

श्यामकुमार पुरे/ऑनलाइन लोकमत

सिल्लोड, दि. 7 - तालुक्यातील भराडी व वदोडबाजार या दोन्ही गावाच्या आठवडी बाजारात बकरी ईद तोंडावर आल्याने कुर्बानीमुळे बोकड, मेंढा, शेळी-मेंढीची मागणी प्रचंड वाढलेली असून, या बाजारात जाफरानी बकरा ५१ हजारांत विकला गेला. तर काश्मिरी बोकड लाखाच्या खाली द्यायला मालक तयार झाला नाही. त्याची बोली मात्र 71 हजार पर्यंत लागली. या दोन बाजारात हजारो बोकडांच्या विक्रीतून पाच कोटीची उलाढाल झाल्याचे वडोद बाजार व भराडी स्थानिक बाजाराचे ठेकेदार गोविंद पांडे यांनी सांगितले आहे.

बकरी ईद दिनदर्शिकेनुसार 12 सप्टेंबरला येत आहे, तर चंद्रदर्शन 1 दिवस उशिरा झाल्यामुळे बकरी ईद ( ईद उल जुहा) 13 सप्टेंबर मंगळवारी साजरी केली जाणार आहे. मुस्लिम समाजाचा त्यागाचा प्रतीक असलेल्या या सणाला समाज बांधव कुर्बानीसाठी सुंदर आणि आकर्षक देखणा गोंडस बकऱ्याची निवड करतात. पण त्याचबरोबर त्या जनावरांचा दात, हात, पाय कान, शिंग अशा प्रकारे शरीराचा कुठलाही अवयव तुटलेला नसावा. या बाबीही बारकाईने पाहतात. एरवी सरासरी वजनाकडे लक्ष देतात. मात्र अशा वेळी सुंदरता-देखण्यावरच बोकड खरेदीवर भर देत असल्यानेच बोकड -मेंढा ,शेळी-मेंढी बाजाराला तेजी आलेली आहे.

51 हजारात जाफरानी

अजुन बकरी ईद ला 4 दिवस बाकी असले तरी या दोन बाजारातच पाच कोटीच्यावर उलाढाल झाली असून लोणावळाच्या माजी नगराध्य सोमनाथ अन्सारी यांनी कुर्बानीसाठी जाफरानी जातीचा लांब केस उभे धारदार सिंग असलेला भारदस्त बोकड ५१ हजारात विकत घेतला आहे.



काश्मिरी बोकडाचे लागले 71 हजार..
सिल्लोडच्या व्यापाऱ्याने मुंबईहून आणलेला कमी उंची असलेला सशासारखा गोंडस पांढरा शुभ्र काश्मिरी बोकडाची किंमत 71 हजार लावण्यात आली. पण बोकड बोरगाव सारवनी येथील व्यापाऱ्याने 1 लाख रुपयांपेक्षा कमीत देणार नाही, असा हट्ट वडोद बाजारमध्ये केला. म्हणून तो बोकड अजूनही विकला नाही. या शिवाय भराडीच्या बाजारात डोक्यावर चांद, तारा असलेल्या बोकडाचीही साठ हजाराच्या वर बोली लागली. तरीही एका लाखापेक्षा कमी किमतीत मालक विकायला तयारच नसल्याचे चित्र पहायला मिळाले.
सिल्लोड परिसरातील भराडी व वदोडबाजार हे दोन्ही बाजार जिल्ह्यातच नव्हे तर राज्य परराज्यात प्रसिध्द आहेत.या बाजारात आसपासचे गोट फार्मचे चालक लहान सहान शेतकारीवर्गासह शेळी-मेंढी,बोकुड-मेंढपाळ दोन पैसे कमविण्याची संधी म्हणून खास करून बकरी ईदच्याच वेळी संभाळलेल्या अशा जनावरांची विक्री करतात.
सर्वसामान्य अशा क्षेत्रातील व्यक्ती बकरी ईदच्या प्रतिक्षेतच असतात असे मोतीराम पंडित,सूर्यभान पाटील ,लक्ष्मण कल्याणकर, शेख पाशु याच्यासह अनेक जाणकारांनी बोलून दाखविले.खासकरून बकरी ईदच्या मूहर्तावार अधिकचे दोन पैसे कमविण्यासाठी दूर-दुरून राज्य व परराज्यातून खरेदीदार व व्यापारी गोट फार्मचे चालक,शेळी-मेंढी शेतकरी विशेष जातींच्या बोकुड-मेंढा तसेच शेळी-मेंढीसह जाफरानी, काश्मिरी, राजस्थानी, काठेवाडी, यासह महाराष्ट्रीयन पिवर गावरान होस्टन वगळता खरेदी करतात.
कुर्बानी साठी कुठलेच अवयव कटलेले व कुठलेही आजार नसलेली जनावरेच बाजारात विण्यासाठी आणतात कारण मुस्लिम समाज अशाच जनावारांची कुर्बानी करतात ज्या मध्ये कुठलेच डाग नाही.

(सर्व छायाचित्रे- श्यामकुमार पुरे)

Web Title: The bucks market rally in Sillod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.