बुद्धी दे गणनायका
By admin | Published: August 31, 2014 01:39 AM2014-08-31T01:39:50+5:302014-08-31T01:39:50+5:30
आज प्रत्येक सण-उत्सवाचे बाजारीकरण करण्यात आपण बाजी मारली आहे. ईद व ािसमस या सणांचे सुद्धा इतके बाजारीकरण झाले नाही,
Next
डॉ. सच्चिदानंद शेवडे
वण संपताच भाद्रपद उजाडतो, तो श्री गजाननाच्या आगमनाने होय. सर्वत्र गणोशभक्तांच्या स्वागताचे फलक झळकू लागतात. दहीहंडीनंतर गणोशोत्सव हा अनेक पुढा:यांच्या इव्हेंट लिस्टमध्ये असतो. आज प्रत्येक सण-उत्सवाचे बाजारीकरण करण्यात आपण बाजी मारली आहे. ईद व ािसमस या सणांचे सुद्धा इतके बाजारीकरण झाले नाही, याचे मुख्य कारण म्हणो हिंदूंमध्ये असलेला धर्मशिक्षणाचा अभाव होय. त्यामुळे देवाला आम्ही देव न मानता दोस्त मानू लागलो आहोत. देवाबद्दलची आदराची भावना लयाला चालली आहे. एकदा तसे झाले की, सण व उत्सवाचा इव्हेंट होतो. देवांचा आधार घेत जाहिराती बनवल्या जाऊ लागतात. त्यांची विडंबनात्मक चित्रे काढून त्यांची प्रदर्शने भरवली जातात. कंपन्यांच्या उत्पादन वेष्टनांवर देवांची चित्रे छापली जाऊ लागतात. फटाक्यांवर देवांची चित्रे येतात. साहजिकच हळूहळू आम्हाला त्याचे काहीच वाटेनासे होते. मग या गोष्टीला आडकाठी करू पाहणा:यांना आम्हीच प्रतिगामी, स्वघोषित संस्कृतीरक्षक वगैरे ठरवून त्यांची हेटाळणी करतो. एकतर, मला काय त्याचे, ही वृत्ती आमची बनते अथवा तुम्हालाच का खटकते, हा प्रश्न माध्यमांद्वारे आमच्या माथ्यावर मारला जातो.
लोकमान्यांनी गणोशोत्सवास सार्वजनिक रूप दिले ते सर्वामध्ये एकीची भावना निर्माण व्हावी यासाठी! श्रीगणोश ही देवता बल आणि बुद्धी या दोहोंची आहे. या दोन गोष्टींना पूरक असे कार्यक्रम या 1क् दिवसांत होणो आवश्यक आहे. पण सध्या चित्र भलतेच दिसते. डीजेचा कर्णकर्कश आवाज दिवसभर चालू असतो. गणोशोत्सव मंडळांची संख्या प्रतिवर्षी वाढत आहे. वर्गणी गोळा करून ते पैसे उडवणो, हा नवा धंदा वाढतो आहे. जागृत गणपती, नवसाचा गणपती, अमका राजा वगैरे.. हे सगळे अलीकडे उदयाला आलेले प्रकार आहेत. जाहिरातींच्या मा:याला आम्ही बळी पडतो आणि दर्शनासाठी रांगांमध्ये तिष्ठत उभे राहतो. मोठाले देखावे आणि भपका याला आम्ही भुलतो आणि गणोशोत्सवाचा मूळ उद्देश बाजूला पडतो. लोकमान्यांना दारू पिऊन नाचणारी आणि स्टेजच्या बाजूला बसून जुगार खेळणारी तरुणाई अपेक्षित नव्हती, हे आमच्या डोक्यातच येत नाही. बुद्धिदात्याचा उत्सव हा बुद्धीला चालना देणाराच असायला हवा. पूर्वी मेळे, भजन, पोवाडे, प्रवचने याद्वारे जनजागृती केली जात असे. आज यातील काही दिसणो सुद्धा दुरपास्त झाले आहे. ऑर्केस्ट्रा, सिनेमा, नाटक, रेकॉर्ड डान्स यातून कसली जागृती होणार?
व्याख्याने व शास्त्रीय संगीत तर हद्दपार होऊ लागले आहे. अर्थात, याला सन्माननीय अपवाद असलेली मंडळे आहेत. (नसती तर आमच्यासारखे व्याख्याते घरीच बसले असत़े) राष्ट्रविचार आणि धर्माबद्दलचे ज्ञान अशा प्रबोधनपर कार्यक्रमांतून सर्वसामान्यांर्पयत जाते. सर्वामुखी मंगल बोलवावे, हे आपल्या परंपरेने सांगितले आहे. श्री गणोशाने आपल्या देवनागरी लिपीला निर्माण केले, अशी मान्यता आहे. पहिले स्त्री सैन्य बनवण्याचा मान सुद्धा गजाननाकडेच आहे. देवांतकाबरोबरच्या युद्धात हे स्त्री सैन्य लढले होते. महाभारताचे लेखन त्यांनी केले, ही गोष्ट सर्वश्रुत आहेच. कार्यारंभी पुजली जाणारी ही विद्येची देवता मूर्तिरूपाने जगभर आढळते. यावरून येथील संस्कृती जगभरात गेली होती, याची साक्ष पटावी. अॅलीस गॅटीच्या टल्लॅ1ंस्रँ डल्ल ळँी ए’ीस्रँंल्ल3 ऋूंी ि¬ िया ग्रंथात आहे. अमरेंद्र गाडगीळ यांच्या गणोशकोशात या देवतेची तपशीलवार माहिती दिली आहे. प्रा. स्वानंद पुंड यांची गणपतीवरील पुस्तके अप्रतिम आणि माहितीपूर्ण आहेत. संक्षिप्त असलेल्या ‘बाप्पा मोरया’ या आमच्या पुस्तकाची नवी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. गणपतीची माहिती देणारी अनेकानेक पुस्तके बाजारात आली आहेत. कालपरत्वे सर्व बदल होत असतात, हे मान्य. पण म्हणून जे आपले आहे ते सर्व त्याज्य असे नव्हे. आजची युवा पिढी अत्यंत हुशार आहे, यात शंकाच नाही.