Budget 2018 : हवेतील अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 05:33 AM2018-02-02T05:33:37+5:302018-02-02T05:35:23+5:30
कधीही अस्तित्वात येऊ न शकणारा हवेतील अर्थसंकल्प अर्थमंत्री जेटली यांनी मांडला आहे. अर्थसंकल्पात निव्वळ आकडेवारीचा खेळ मांडला आहे.
- डॉ. गिरीधर पाटील
(कृषी अर्थतज्ज्ञ, शेतकरी आंदोलनाचे नेते)
कधीही अस्तित्वात येऊ न शकणारा हवेतील अर्थसंकल्प अर्थमंत्री जेटली यांनी मांडला आहे. अर्थसंकल्पात निव्वळ आकडेवारीचा खेळ मांडला आहे. २५ वर्षांपासून देशातील शेतकरी व सर्वसामान्य मोठमोठी आकडेवारी ऐकतो आहे. परंतु, बाजार व्यवस्थेत सुधारणा झालेली नाही. जाहीर होणारा आकड्यांच्या खेळ अस्तित्वात उतरतच नाही. त्यामुळे कितीही मोठी आकडेवारी सांगितली तरी त्याचा शेती क्षेत्रावर परिणाम होईल असे वाटत नाही. गतवेळी बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु, वर्षभरात कांदा, तूर, सोयाबीनच्या दरांमध्ये प्रचंड घसरण होऊनही सरकारी यंत्रणेने हस्तक्षेप करून बाजार सावरला नाही, अन्य तरतुदींची अंमलबजावणी झालेली नाही. शेतमाल बाजार एक करण्याची घोषणा सरकारने केली होती. गेल्या तीन वर्षांत त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.