Budget 2018: अर्थसंकल्प नाही, हा तर 'भ्रम'संकल्प, सुप्रिया सुळेंची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 05:15 PM2018-02-01T17:15:22+5:302018-02-01T17:18:04+5:30
'बड्यांच्या कर्जवसुलीसाठी काहीही नाही...पेट्रोलच्या किमती कमी होण्यासाठी काहीही नाही...
मुंबई- 'बड्यांच्या कर्जवसुलीसाठी काहीही नाही...पेट्रोलच्या किमती कमी होण्यासाठी काहीही नाही...शेतीला कर्ज मिळण्याची सोय काहीही नाही... बँकांचे चार्जेस कमी करायला काहीही नाही... मोठ्ठे मोठ्ठे आकडे दाखवायचे आणि पैसे वाटायची वेळ आली की कागदपत्रात अडकवायचं!! हा तर 'भ्रम'संकल्प!!#Budget2018', अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत मोदी सरकारच्या कडाडून टीका केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) 2018-19 चा अर्थसंकल्प सादर केला. यावर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून जोरदार टीका केली.
मध्यमवर्गीयांवर आता कराचा बोजा वाढवणार आणि 250 कोटीची उलाढाल करणारे 'छोटे आणि मध्यम' उद्योजक? त्यांना करसवलत? असा सवाल उपस्थिक करत हा तर 'भ्रमसंकल्प' अशी टीका करणारं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं.
एका बाजूला 40000 द्यायचे आणि दुसरीकडून वैद्यकीय खर्च आणि वाहतूक भत्ता काढून घ्यायचा, म्हणजे मध्यमवर्गीयांना फायदा शून्य, असंही सुप्रीया सुळे यांनी म्हंटलं आहे. केंद्र सरकारने गुरूवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून कडाडून टीका होते आहे.