Budget 2021: "अर्थसंकल्प म्हणजे ३० कोटी भारतीयांना उभारी देणारा अन् आत्मनिर्भर भारत संकल्प पूर्ण करणारा"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 02:23 PM2021-02-01T14:23:23+5:302021-02-01T14:24:35+5:30
Budget 2021, Pradeep Peshkar : एकंदरच कोविड महामारीचे सावट असताना एकशे तीस कोटी भारतीयांना उभारी देणारा अर्थसंकल्प होय, असे मत प्रदीप पेशकार यांनी व्यक्त केले.
मुंबई : कोविड काळात जागतिक अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना भारतीय अर्थव्यवस्था सावरताना फाईव्ह ट्रिलीयन अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त करणऱ्या योजना आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषित केल्या. सर्वस्पर्शी म्हणजे उद्योग, कृषी, शेतकरी, कामगार, आरोग्य, शिक्षण, इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी क्षेत्रांना प्रगतीची दारे खुली करून देणारा हा अर्थसंकल्प आहे, असे राज्यातील भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी म्हटले आहे.
नाशिक व नागपूर मेट्रो साठी मोठी तरतूद व आरोग्य क्षेत्रासाठी दोन लाख 23 हजार कोटी, जल जीवन मिशन साठी दोन लाख 87 हजार कोटी, तर 35 हजार कोटी कॉमेट लसीसाठी हे प्रामुख्याने सांगावे लागेल. 7 नवीन मेगा टेक्स्टाईल पार्क ची घोषणा ही रोजगार निर्मिती बरोबरच कृषी क्षेत्राला उभारी देणारी आहे .लघुउद्योगांना उभारी देताना डिमांड वाढवण्यासाठी अनेक उत्पादनावरील आयात शुल्क वाढवले आहे. तसेच स्टील व आलाँय यांची भाववाढ रोखण्यासाठी आयात शुल्क कमी करून लघु उद्योगाला दिलासा दिलेला आहे, असे प्रदीप पेशकार यांनी सांगितले.
याचबरोबर, उद्योगासाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे विज डिस्ट्रीब्यूशन कंपन्यांना स्पर्धा व्हावी, या उद्देशाने दोन पेक्षा अधिक वीज वितरण कंपन्या असतील अशी योजना केली.कंपनी कायद्यातील बदलाबरोबरच ईज ऑफ डुईंग बिझनेस साठी विशेष योजना जाहीर केली . एकंदरच कोविड महामारीचे सावट असताना एकशे तीस कोटी भारतीयांना उभारी देणारा अर्थसंकल्प होय, असे मत प्रदीप पेशकार यांनी व्यक्त केले.