Budget 2023: महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय मिळाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 07:22 AM2023-02-02T07:22:03+5:302023-02-02T07:22:42+5:30

Budget 2023: महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय मिळाले? यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती अशी...

Budget 2023: What did Maharashtra get from the budget? | Budget 2023: महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय मिळाले?

Budget 2023: महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय मिळाले?

googlenewsNext

कृषी पतसंस्थांना मल्टिपर्पजचा दर्जा
महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय मिळाले? यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती अशी...
सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा आहेत. कृषी पतसंस्थांना आता मल्टिपर्पज सोसायटीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या संस्थांना आता कोल्ड स्टोरेजपासून पेट्रोल पंप चालवण्यापर्यंतचे व्यवसाय करता येणार आहे. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. 
साखर कारखान्यांना १० हजार कोटींची कर सवलत
२०१६ पूर्वी कारखान्यांनी एफआरपीसाठी केलेला खर्च हा कर सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना जवळपास १० हजार कोटींचा कर भरावा लागणार नाही. एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचा लाभ महाराष्ट्राला होऊ शकतो. 

Web Title: Budget 2023: What did Maharashtra get from the budget?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.