अलिबाग नगरपरिषदेचा शिलकी अर्थसंकल्प

By Admin | Published: March 1, 2017 02:55 AM2017-03-01T02:55:07+5:302017-03-01T02:55:07+5:30

अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सभेत मंजूर करण्यात आले.

The budget budget of Alibaug Municipal Council | अलिबाग नगरपरिषदेचा शिलकी अर्थसंकल्प

अलिबाग नगरपरिषदेचा शिलकी अर्थसंकल्प

googlenewsNext


अलिबाग : नगरपरिषदेचा २०१६-१७ चा सुधारित व सन २०१७ -१८चे ५ कोटी शिलकीचा ४४ कोटी ७९ लाख रुपयांचा अर्थसंकसंकल्पीय अंदाजपत्रक अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सभेत मंजूर करण्यात आले.
या अर्थसंकल्पात वैशिष्ट्ये पूर्ण अनुदानातून क्षेत्रविकास श्रीबाग क्रमांक-२ या ठिकाणाचे क्रीडासंकुल विकास प्रकल्पाकरिता दोन कोटींची तरतूद करण्यात आली. १४व्या वित्त आयोगातून घनकचरा व्यवस्थापनासाठी, प्राथमिक शाळा-शिक्षणाकरिता, उर्दू शाळा- शिक्षणाकरिता, पाणीपुरवठा व्यवस्थापन, भूमिगत गटार व्यवस्था, रस्ते बांधकाम दुरुस्ती, मार्केट बांधकामाकरिता एमएमआरडीएकडून प्राप्त होणाऱ्या विशेष अनुदानातून रस्ते व सार्वजनिक सुविधांकरिता ३ कोटी रुपयांची तरतूद ठेवल्याचे नाईक यांनी सांगितले. शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत निधी राज्यस्तर व जिल्हास्तर यांच्याकडून अनुदान प्राप्त होणार आहे. त्यासाठी रस्त्यांना प्राधान्य देऊन दोन कोटी रुपयांची तरतूद ठेवण्यात आली आहे. पाच कोटी रुपये शिलकीचा आणि ४४ कोटी ७९ लाख रुपयांचा, कोणत्याही प्रकारची करवाढ नसलेला अर्थसंकल्प मंजूर के ला आहे.सभेस उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, सर्व विषय समितीचे सभापती व सर्व नगरसेवक, अलिबाग नगरपरिषदेचे प्र. मुख्याधिकारी दयानंद गोरे व कर्मचारी उपस्थित होते.
१२ लाख रुपये
महिला व बाल विकास
१२ लाख रुपये
मागासवर्गीय कल्याण
२० लाख रुपये
नागरी गरिबांसाठी राखीव
२५ लाख रुपये
वीज साहित्य खरेदी,दुरूस्ती
८० लाख रुपये
घनकचरा व्यवस्थापन
१० लाख रुपये
प्राथमिक शाळा-शिक्षण
०८ लाख रुपये
उर्दू शाळा- शिक्षण
२० लाख रुपये
पाणीपुरवठा व्यवस्थान
१.४ कोटी रुपये
भूमिगत गटार व्यवस्था
१.५ कोटी रुपये
रस्ते बांधकाम दुरूस्ती
१० लाख रुपये
मार्केट बांधकाम
३ कोटी रुपये
रस्ते व सार्वजनिक सुविधा

Web Title: The budget budget of Alibaug Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.