अर्थसंकल्पात मुंबई ट्रॅकवर येणार?

By admin | Published: July 8, 2014 12:29 AM2014-07-08T00:29:51+5:302014-07-08T00:29:51+5:30

रेल्वे अर्थसंकल्प 8 जुलैला सादर केला जाणार आहे. यामध्ये मुंबई ट्रॅकवर येणार की सायडिंगला जाणार हे पाहणो औत्सुक्याचे ठरेल.

Budget to come on Mumbai track? | अर्थसंकल्पात मुंबई ट्रॅकवर येणार?

अर्थसंकल्पात मुंबई ट्रॅकवर येणार?

Next
मुंबई : रेल्वे अर्थसंकल्प 8 जुलैला  सादर केला जाणार आहे. यामध्ये मुंबई ट्रॅकवर येणार की सायडिंगला जाणार हे पाहणो औत्सुक्याचे ठरेल. गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईला फक्त तीन घोषणांवर समाधान मानावे लागल्याने आणि काही प्रकल्पांना निधी मंजूर झाल्याने यंदा यामध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा बाळगण्यात आली आहे. त्यामुळे 75 लाख प्रवाशांचे या रेल्वे अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून आहे. 
गेल्या दीडशे वर्षात मुंबईतील  रेल्वे मार्गावरील सुधारणा आणि मिळणा:या सुविधा पाहिल्यास आणखी बरेच काही मिळणो बाकी असल्याचे दिसते. मध्य रेल्वे मार्गावरून साधारण 40 लाख तर पश्चिम रेल्वे मार्गावरून 35 लाख प्रवासी प्रवास करतात. पश्चिम रेल्वे मार्गावरून जवळपास 700 तर मध्य रेल्वे मार्गावरून 756 कोटी रुपये उत्पन्न मागील वर्षात रेल्वेला मिळाले आहे. मिळणारे उत्पन्न पाहता अजूनही अत्याधुनिक अशा सेवासुविधा रेल्वेकडून मुंबईकरांना मिळालेल्या नाहीत. मागील दोन रेल्वे अर्थसंकल्पांत एसी लोकलची तसेच बम्बार्डियर लोकलची घोषणा करण्यात आली. मात्र यापैकी एकही लोकल मुंबईकरांच्या सेवेत आलेली नाही. महिला प्रवाशांसाठी उत्तम प्रसाधनगृहांची घोषणाही करण्यात आली होती. मात्र रेल्वे मंत्रलयाला त्याचाही विसर पडलेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एसी लोकल सप्टेंबर महिन्यात येणार असल्याचे सांगितले जाते. तर दोन बम्बार्डियर लोकलच्या गेल्या आठ महिन्यांत चाचण्या घेतल्यानंतरही त्या ताफ्यात लवकरच येतील, असे सांगितले जाते. 
गेल्या अर्थसंकल्पात रेल्वेकडून एमयूटीपीच्या प्रकल्पांसाठी काही निधी मंजूर केला. मात्र मिळालेल्या तुटपुंज्या निधीनंतर एमयूटीपीच्या काही प्रकल्पांची कामे अतिशय कुर्मगतीने सुरू आहेत. त्यातच एमयूटीपी-2 मधील प्रकल्पांच्या किमती वाढल्याने हे प्रकल्प आता रेल्वेला महागडे ठरू लागले आहेत. एमयूटीपी-2 अंतर्गत सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावा मार्ग, ठाणो ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, हार्बरवर अंधेरीचा गोरेगावर्पयत विस्तार, डीसी-एसी परावर्तन, डब्यांची बांधणी, लोकलची देखभाल सुविधा, लोकलसाठी स्वतंत्र जागा, तांत्रिक साहाय्य, प्रकल्पांचे पुनर्वसन, स्थानक विकास आणि रूळ ओलांडण्यासाठी योजना असे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या सगळ्या प्रकल्पांची एकूण किंमत ही 5 हजार 300 कोटी रुपये एवढी आहे. प्रकल्पांसाठी मंजूर झालेला निधी येण्यास लागणारा उशीर, प्रकल्पांसाठी लागणा:या साधनसामग्रीत झालेली वाढ इत्यादी कारणांमुळे गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या या प्रकल्पांच्या किमतीत वाढ झाली आहे. यातील तीन प्रकल्प वगळता अन्य प्रकल्पांत मोठी वाढ आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गाच्या प्रकल्पात 264 कोटी 78 लाख, मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहाव्या मार्गाच्या प्रकल्पात 527 कोटी 91 लाख आणि डीसी ते एसी परावर्तनाच्या प्रकल्पात 446 कोटी 91 लाख रुपयांची भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात या प्रकल्पांना आणखी निधी मिळून ते पुढे सरकण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
 
प्रकल्पमंजूर निधी आवश्यक निधी
सीएसटी-कुर्ला 5-6 मार्ग659923.78
मुंबई सेंट्रल-बोरीवली सहावा मार्ग5221049.91
ठाणो-दिवा पाचवा-सहावा मार्ग133287.62
अंधेरी ते गोरेगाव हार्बरचा विस्तार103147.60
डीसी-एसी परावर्तन293739.91
डब्यांची बांधणी2,9303041.13
लोकलची देखभाल सुविधा205323.67
लोकलसाठी स्थिर आणि स्वतंत्र जागा141178.91
तांत्रिक साहाय्य6262
प्रकल्पांचे पुनर्वसन124124
स्थानकांचा विकास 128128 
 

 

Web Title: Budget to come on Mumbai track?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.