हा अर्थसंकल्प म्हणजे संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा केलेला निर्धार : केशव उपाध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:26 PM2021-02-01T14:26:50+5:302021-02-01T14:28:54+5:30

आज अर्थमंत्र्यांनी सादर केला देशाचा अर्थसंकल्प

This budget is a decision to turn the crisis into an opportunity bjp leader Keshav Upadhye | हा अर्थसंकल्प म्हणजे संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा केलेला निर्धार : केशव उपाध्ये

हा अर्थसंकल्प म्हणजे संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा केलेला निर्धार : केशव उपाध्ये

Next
ठळक मुद्देआज अर्थमंत्र्यांनी सादर केला देशाचा अर्थसंकल्पअर्थसंकल्प आश्वासक आणि नवी उमेद देणारा : केशव उपाध्ये

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. "जगातील सर्वच देश कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडले असताना भारताने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा निर्धार या अर्थसंकल्पात केलेला दिसून येत आहे. मरगळलेल्या सर्वच क्षेत्रांना मदतीचा हात देत, बळ पंखांना दिले हे, घे भरारी आकाक्षांची असा विश्वासच आज अर्थसंकल्पाने सर्व भारतीयांना दिला आहे," अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

कोरोना संकट त्यातून ढासळलेली अर्थव्यवस्था, त्यातून निर्माण झालेले प्रश्न या पार्श्वभूमीवर आरोग्य, उद्योग आणि शेती, पायाभूत सोयीसुविधा या घटकांवर विशेष लक्ष देण्याची गरज लक्षात घेत अर्थसंकल्पात तरतुदी केल्या आहेत. त्यामुळे नव्या दशकाचा पहिला अर्थसंकल्प हा खूपच आश्वासक असून सर्वांनाच नवी उमेद देणारा आहे. पाच ट्रीलयन डॉलर अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठी केलेल्या १३ क्षेत्रांची निवड करत पाच वर्षात १ लाख ९ कोटी रूपये खर्च करण्याची तयारी, आरोग्य क्षेत्राच्या बजेटमध्ये घसघशीत वाढ २.३८ लाख कोटी रुपयांची तरतूद, शेतकऱ्यांना दीडपड उत्पादन खर्चाच्या हमीभाव देणे, उज्ज्वला योजनेचा विस्तार करत एक कोटी लाभार्थ्यांचा सहभाग,  रस्ते व रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी रोड प्लान २०३०, उद्योगांना उभारी देण्यासाठी तरतूद ,रोजगार निर्माणासाठी भरभक्कम पावले हे अधोरेखित करणारे निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले असल्याचंही उपाध्ये म्हणाले. 

"टेक्सटाईल पार्क्समुळे शेतकऱ्यांना मदत होईलच पण त्यामुळे रोजगारातही वाढ होईल. त्याशिवाय निर्यातीला देण्यात आलेल्या प्रोत्साहनामुळे आत्मनिर्भर भारत निर्माणाच्या दिशेने होणारी वाटचाल वेगाने होईल," असेही त्यांनी नमूद केले.
 

Web Title: This budget is a decision to turn the crisis into an opportunity bjp leader Keshav Upadhye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.