शेतकरी अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू आहे सांगत मुनगंटीवारांनी मांडला अर्थसंकल्प

By admin | Published: March 18, 2016 02:27 PM2016-03-18T14:27:31+5:302016-03-18T14:27:31+5:30

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थयसंकल्प मांडला. कृषी क्षेत्राचा विकासदर 8 टक्यांपर्यंत पोहोचला आहे सांगत शेतकरी या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू असल्यांच मुंनगंटीवारांनी सांगितलं

The budget estimates by farmers are the centerpiece of the budget | शेतकरी अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू आहे सांगत मुनगंटीवारांनी मांडला अर्थसंकल्प

शेतकरी अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू आहे सांगत मुनगंटीवारांनी मांडला अर्थसंकल्प

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई,दि. १८ - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थयसंकल्प मांडला. कृषी क्षेत्राचा विकासदर 8 टक्यांपर्यंत पोहोचला आहे सांगत शेतकरी या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू असल्यांच मुंनगंटीवारांनी सांगितलं. अर्थसंकल्प मांडताना सुरुवातीलाच शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यस्थेचा कणा असल्यांच सांगत हा अर्थसंकल्प शेतक-यांना समर्पित करत असल्याचं मुनगंटीवार बोलले. कृषीक्षेत्रासाठी  25 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून 2016 - 17 शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती देत आपलं सरकार शेतक-यांच्या कल्याणासाठी काम करत असल्याची हमी मुनगंटीवारांनी दिली.  
 
जलयुक्त शिवारसाठी १ हजार कोटींची तरतुद करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर शेतक-यांना सर्वात भरीव मदत यावर्षी सरकारने केली आहे. शेतक-यांसाठी राज्य आणि केंद्र सरकारची ४ हजार कोटींची तरतुद असून १८८५ कोटी राज्य सरकारने पीक विमासाठी तरतुद केली असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पारंपारिक तंटे मिटवण्यासाठी पाणंद रस्ता योजनेची घोषणा यावेळी करण्यात आली.  
 
शेततळी, विहिरी, विद्युत पंप जोडणीसाठी 2 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अल्प व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.मत्स्यसंवर्धनासाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर कडधान्य आणि तेलबीयांसाठी 80 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.दोन नव्या पशू महाविद्यालयांसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली असून कृषीप्रक्रिया उद्योग उभारणा-ला 25 टक्के किंवा 50 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार असल्याचंही मुनगंटीवारांनी सांगितलं.
 

Web Title: The budget estimates by farmers are the centerpiece of the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.