अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून; विधिमंडळ सभागृहात उमटणार तीव्र राजकीय संघर्षाचे पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 06:22 AM2023-02-26T06:22:53+5:302023-02-26T06:23:11+5:30
राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या तीव्र राजकीय संघर्षाचे तीव्र पडसाद सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. २४ मार्चपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात ९ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे.
राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होईल. शिवसेनेतील सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला असून आरोप- प्रत्यारोपांचा धुराळा उठला असताना सत्ताधारी भाजप- शिंदे सेना विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात अधिवेशनातही कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळेल, अशी चिन्हे आहेत. विधिमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयाच्या ताब्यावरून दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे. १४ मार्चपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे.
कसबा आणि पिंपरी- चिंचवडमधील विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल २ मार्चला लागणार असून त्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघेल आणि अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटतील.
विरोधकांची आज बैठक; चहापानावर बहिष्कार?
n मविआच्या नेत्यांची बैठक रविवारी दुपारी विधानभवनात होईल. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार पत्रपरिषद घेऊन अधिवेशनातील मविआची रणनीती जाहीर करतील.
n मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंपरेनुसार सायंकाळी बोलविलेल्या चहापानावर विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता अधिक आहे.