पायाभूत सेवांना बळकटी देणारा अर्थसंकल्प

By admin | Published: March 19, 2017 02:29 AM2017-03-19T02:29:59+5:302017-03-19T02:29:59+5:30

राज्याच्या अर्थसंकल्पात पायाभूत सेवा-सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, मुंबई, नागपूर आणि पुण्याच्या मेट्रो प्रकल्पांसह विमानतळ, रस्ते आणि ऊर्जा क्षेत्रांसाठी

Budget strengthening infrastructure | पायाभूत सेवांना बळकटी देणारा अर्थसंकल्प

पायाभूत सेवांना बळकटी देणारा अर्थसंकल्प

Next

- सचिन लुंगसे

राज्याच्या अर्थसंकल्पात पायाभूत सेवा-सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, मुंबई, नागपूर आणि पुण्याच्या मेट्रो प्रकल्पांसह विमानतळ, रस्ते आणि ऊर्जा क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ‘महाइन्फ्रा’ ही संस्था स्थापन करण्यात येणार असून, रस्ते व बांधकामांसाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने पायाभूत सेवांना आणखी बळकटी येणार आहे.
मेट्रो शहरांच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई, नागपूर आणि पुणे मेट्रो प्रकल्पांसाठी ७१० कोटी देण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीसाठी १ हजार ६०० कोटींच्या निधीमुळे शहरे आणखी स्मार्ट होणार असून, विकासाचा वेग वाढण्यास मदत होईल. महत्त्वाचे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी भागात २ लाख ५० हजार घरे बांधण्यात येणार असल्याने घरांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी १ हजार ६३० कोटी निधी राखून ठेवण्यात आल्याने रस्त्यांचे जाळे वाढणार असून, ५७० कोटी रुपये एवढा निधी पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत मिळणार आहे.

विमानतळांना संजीवनी : विमानतळांच्या विकासासह प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी ५० कोटींच्या तरतुदीमुळे या क्षेत्रालाही बळकटी मिळणार आहे. शिर्डी विमानतळाचा जलदगतीने विकास होईल. नागपूर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Web Title: Budget strengthening infrastructure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.