बजेट शेतक-यांसाठी असेल - देवेंद्र फडणवीस
By admin | Published: March 18, 2017 12:33 PM2017-03-18T12:33:25+5:302017-03-18T12:42:34+5:30
राज्य सरकार कर्जबाजारी शेतक-यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. केंद्र सरकारही शेतक-यांच्या पाठिशी आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - राज्य सरकार कर्जबाजारी शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. केंद्र सरकारही शेतक-यांच्या पाठिशी असून काल आमची केंद्र सरकारबरोबर सकारात्मक चर्चा झाली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिल्ली भेटीवर विधानसभेत माहिती देताना सांगितले.
आज राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र त्याआधी शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले आहेत. विधानभवनाच्या पाय-यांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दिल्ली भेटीवर सभागृहात निवेदन देताना मुख्यमंत्री म्हणाले की, 31 लाख शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे. 70% शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांनी आम्ही का भरु कर्ज ? असा विचार केल्यास बँकिंग व्यवस्था कोलमडेल. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांचाही विचार करावा लागेल असे मुख्यमंत्री म्हणाले. सादर होणार बजेट हे शेतक-यांसाठीच असेल. कर्जमाफीच्या मुद्याच राजकारण करु नका, घोषणा देऊन तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी बनू शकत नाही असे टोला त्यांनी विरोधकांना लगावला.