रेल्वेचा निराशाजनक अर्थसंकल्प
By admin | Published: July 9, 2014 12:18 AM2014-07-09T00:18:18+5:302014-07-09T00:18:18+5:30
रेल्वे अर्थसंकल्पाने नवी मुंबईसह पनवेल परिसरातील लाखो प्रवाशांना निराश केले आहे.
Next
नवी मुंबई : रेल्वे अर्थसंकल्पाने नवी मुंबईसह पनवेल परिसरातील लाखो प्रवाशांना निराश केले आहे. पनवेल - सीएसटी फास्ट ट्रेनसह इतर कोणतीच मागणी पूर्ण झालेली नाही. रेल्वे डबे वाढविण्यासह नवीन स्थानकांचे काय होणार याचे उत्तर मिळालेले नसून अर्थसंकल्पाने घोर निराशा केल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे नवी मुंबई, पनवेलमधील प्रवाशांच्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. भरभरून मतदान केले आता प्रवाशांना चांगले दिवस येणार का याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु रेल्वे अर्थसंकल्पात हार्बर व ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी एकही ठोस योजना दिसली नाही. हार्बर मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढत असून ट्रेनची संख्या व डबे वाढविण्याची मागणी प्रवासी करत आहेत. पनवेलवरून छत्रपती शिवाजी टर्मिनलला जाण्यासाठी दीड तास लागत आहे. या मार्गावर फास्ट ट्रेन सुरू करण्यात यावी. पनवेल -उरण, पनवेल - कजर्त, सीवूड -उरण रेल्वेसाठी भरीव तरतूद करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
प्रवाशांची
तीव्र नाराजी
रेल्वे प्रवाशांनीही अर्थसंकल्पाविषयी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प येतो. परंतु रेल्वे क्रॉसिंग, पाणपोई, इंडीकेटर, पंखे यासारखे छोटे प्रश्नही सुटत नाही. रेल्वे स्थानकांमध्ये अपंग प्रवाशांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. स्टेशनच्या इमारती भव्य आहेत परंतु येथे सुविधा अजिबात मिळत नाही. सरकारने यावेळीही हार्बरवरील प्रवाशांना वा:यावर सोडले असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.
ठोस उपाययोजना नाहीत
4ट्रान्स हार्बर मार्गावर नवी मुंबईत पाच रेल्वे स्टेशन आहेत. या मार्गावर खैरणो- बोनकोडे व दिघा येथे रेल्वे स्टेशन मंजूर झाले आहे. सदर रेल्वे स्टेशनच्या बांधकामाविषयी ठोस उपाययोजना दिसत नाही. हार्बर मार्गावरील प्रवाशांना गृहीतच धरले नसल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली असून हेच का चांगले दिवस असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रेल्वेमंत्र्यांना भेटून समस्या मांडणार
4ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली. ट्रेनची संख्या वाढविणो, डबे वाढविणो, फास्ट ट्रेन सुरू करणो यापैकी कोणतीही मागणी पूर्ण झालेली नाही. ट्रान्स हार्बर मार्गावरील दिधा व बोनकोडे स्टेशनचे बांधकाम कोण व कधी करणार यासाठी ठोस तरतूद नाही. सीवूड -उरण मार्गासाठीही तरतूद दिसत नाही. हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची घोर निराशा झालेली आहे. राष्ट्रवादीचे आजी व माजी खासदार रेल्वे मंत्र्यांना भेटून त्यांच्याकडे या समस्या मांडणार आहोत असे सांगितले.
तोंडाला पाने पुसली
4रेल्वे प्रवासी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत धुरत यांनी अर्थसंकल्पाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर्षी हार्बर मार्गावर फास्ट ट्रेन सुरू व्हावी अशी मागणी केली होती. कजर्त पनवेल, उरणचा प्रश्न सुटावा व इतर मागण्यांसाठी आम्ही पाठपुरावा केला होता. परंतु अर्थसंकल्पात कोणीही ठोस तरतूद नसून हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या तोंडाला चक्क पाने पुसली असल्याचे मत व्यक्त केले आहे.