दररोज १०० किमी नवे रस्ते बांधणार

By admin | Published: October 25, 2015 01:34 AM2015-10-25T01:34:18+5:302015-10-25T01:34:18+5:30

रस्ते विकासातून आपल्याला देशाचा विकास साधायचा आहे. यापूर्वी देशात दररोज तीन ते चार किलोमीटर रस्ता बांधला जात होता. आपल्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय आल्यानंतर

Build 100km new roads every day | दररोज १०० किमी नवे रस्ते बांधणार

दररोज १०० किमी नवे रस्ते बांधणार

Next

नागपूर : रस्ते विकासातून आपल्याला देशाचा विकास साधायचा आहे. यापूर्वी देशात दररोज तीन ते चार किलोमीटर रस्ता बांधला जात होता. आपल्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय आल्यानंतर या कामाची गती वाढवून प्रति दिवस १८ किमीपर्यंत रस्ताबांधणी पोहोचली आहे. तथापि, आता दररोज १०० किमी लांबीचे रस्ते बांधण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून त्या दिशेने काम सुरू आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
मध्य प्रदेश - महाराष्ट्र सीमेपासून मनसरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७च्या चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन मनसर येथे शनिवारी नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी केंद्रीय पर्यावरण व वन राज्यमंत्री प्रकाश जावडेकर होते. विशेष अतिथी म्हणून ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रामटेकचे खा. कृपाल तुमाने उपस्थित होते. गडकरी म्हणाले, देशात वर्षभरात पाच लाख अपघात होतात. तांत्रिक चुका, होणारी तडजोड यामुळे बहुतांश अपघात होतात. त्यामुळे येत्या काळात महामार्गांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.

Web Title: Build 100km new roads every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.