मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 09:43 PM2024-11-05T21:43:48+5:302024-11-05T21:46:21+5:30
Mahayuti Kolhapur Sabha : आज कोल्हापुरातून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आहे.
Mahayuti Kolhapur Sabha : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. महायुतीनेही आज कोल्हापुरातून अधिकृतपणे प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
यावेळी फडणवीस म्हणतात, 'कोल्हापुरातून सुरुवात केली की विजय नक्की मिळतो. उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते. ते म्हणाले की, महाराजांचा इंग्रजांवर राग होता म्हणून सुरत लुटली. तुम्हाला आता औरंगजेबाचे नाव घ्यायला लाज वाटत आहे. तुम्ही बाळासाहेबांच्या नावापुढचे हिंदुहृदयसम्राट काढून टाकले. सुरतेला जाऊन महाराजांचे मंदिर बांधणार म्हणाले. 22 वर्षापूर्वीच सुरतमध्ये मोदींजींनी पुतळा उभारला आहे. हे महाविकासआघाडीचे नेते नेहमी खोटे बोलतात. हे ज्या घोषणा करतात, ते कधीच पूर्ण करत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी आज घोषणा केली की, ते संपूर्ण जिल्ह्यात शिवरायांचा पुतळा उभारणार आहेत. मी त्यांना आव्हान देतो, चला मग मुंब्र्यात आपण शिवरायांचा पुतळा उभारू आणि छत्रपतींना मानवंदना देऊ.'
🕘 रा. ८.५५ वा. | ५-११-२०२४📍कोल्हापूर.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 5, 2024
LIVE | महायुती विजय निर्धार सभा#MaharashtraElection2024#Kolhapur#MahaYuti#Maharashtrahttps://t.co/5VkLsvNcgP
'अडीच वर्षात जे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात करुन दाखवले, त्यामुळे त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही. महाविकासआघाडीचे सरकार आले तेव्हा कर्नाटक पहिल्या स्थानावर गेले होते. आमच्या वेळी महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आले. त्यांच्याच राज्यात गुजरात पहिल्या स्थानावर गेले, पण आता पुन्हा एकदा महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रामध्ये आता एकूण गुंतवणुकीच्या 50 टक्के गुंतवणूक आणली आहे. महाविकासआघाडी रोज खोटे बोलतात. गुजरातचे प्रमोशन तुम्ही करताय, तुमचा मराठी बाणा कुठे गेला?' असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला. तसेच, 'भाजपच्या राज्यातील घोषणा बघा सगळ्या घोषणा आम्ही पूर्ण केल्या आहेत. तुम्ही आशीर्वाद द्या, तुमच्या मनातील महाराष्ट्र आम्ही घडवून दाखवू,’ असेही फडणवीस म्हणाले.