धोकादायक पुलांना अधिकाऱ्यांना बांधणार

By Admin | Published: August 7, 2016 01:21 AM2016-08-07T01:21:16+5:302016-08-07T01:21:16+5:30

महाडच्या दुर्घटनाग्रस्त पुलाप्रमाणेच सिंधुदुर्गातही ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाले आहेत. या पुलांवरही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे जीर्ण झालेल्या

Build dangerous bridges to the officers | धोकादायक पुलांना अधिकाऱ्यांना बांधणार

धोकादायक पुलांना अधिकाऱ्यांना बांधणार

googlenewsNext

वैभववाडी (जि.सिंधुदुर्ग) : महाडच्या दुर्घटनाग्रस्त पुलाप्रमाणेच सिंधुदुर्गातही ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाले आहेत. या पुलांवरही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे जीर्ण झालेल्या पुलांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांबाबत जिल्हा काँग्रेस रणनीती ठरविणार असून, धोकादायक पुलांना आम्ही अधिकाऱ्यांना बांधून ठेवू. अधिकारी वाहून गेले की त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून पाच ते दहा लाखांच्या मदतीची घोषणा करू, असे खळबळजनक विधान आमदार नीतेश राणे यांनी केले.
महाडच्या दुर्घटनेतील मृत भूमी पाटेकर यांच्या कुटुंबीयांचे नीतेश राणे यांनी कोकिसरे येथे जाऊन सांत्वन केले. यावेळी राणे म्हणाले की, दुर्घटनेनंतर सांत्वन करून मदत देऊन उपयोग नाही. त्याऐवजी दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाडच्या दुर्घटनाग्रस्त पुलाबाबत तेथील स्थानिक आमदारांनी गेल्या वर्षीच अधिवेशनात प्रश्न विचारला, तेव्हा प्रशासनाने ओके रिपोर्ट दिला होता. ब्रिटिश सरकारने सरकारशी पत्रव्यवहार केल्यानंतर सरकार दुर्घटना घडेपर्यंत कशाला थांबले होते, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. (वार्ताहर)

Web Title: Build dangerous bridges to the officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.