परदेशात गुंतवणूक वाढविली
By admin | Published: May 16, 2015 03:34 AM2015-05-16T03:34:21+5:302015-05-16T03:34:21+5:30
भारत नैसर्गिक साधन संपत्ती क्षेत्रात सध्या अनेक देशांमध्ये गुंतवणूक करत आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान
मुंबई (जुहू हेलीबेस) : भारत नैसर्गिक साधन संपत्ती क्षेत्रात सध्या अनेक देशांमध्ये गुंतवणूक करत आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज मुंबईत दिली. प्रत्यक्ष अभियंते
आणि कर्मचारी कशा परिस्थितीत काम करतात, हे अनुभवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान मुंबईत आले होते, १४ मे रोजी त्यांनी संपूर्ण रात्रही तेथे घालवली. सध्या देशाच्या नैसर्गिक साधनांचा आढावा घेण्याचे तसेच डेटाबेस तयार करणे, सुरु असल्याची महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
देशात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आम्ही परदेशांमध्ये अनेक देशांमध्ये नैसर्गिक साधनांसाठी गुंतवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. लॅटिन अमेरिकेसह अनेक देशांमध्ये भारताने मोठी गुंतवणूक केली आहे. प्रधान पुढे म्हणाले की, मोझाम्बिकमध्ये भारताने सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. आत्तापर्यंत ६ अब्ज डॉलर्स तेथे गुंतवले आहेत.
आणखी ६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारत तेथे
करणार आहे. त्यामुळे अधिकाधिक ‘बायर्स बेनिफिट’ देशासाठी कसे घेता येतील, याकडेही लक्ष आहे. कुठलेही संकट आले तरी त्यातून संधी कशी शोधता येईल, याकडेही आमचा कटाक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. जूनमध्ये होणाऱ्या ओपेकच्या मिटिंगमध्येही भारताची आॅईल डिप्लोमसी दिसून येईल, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. (प्रतिनिधी)