बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणी ३ नगरसेवकाचा जामिन मंजूर
By admin | Published: February 23, 2016 07:04 PM2016-02-23T19:04:15+5:302016-02-23T19:48:21+5:30
बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणी ३ नगरसेवकाचा जामिन ठाणे न्यायालयाने आज मंजूर केला आहे. सुधाकर चव्हाण, हणमंत जगदाळे आणि विक्रांत चव्हाण या तिन्ही नगरसेवकांचा जामिन मंजूर करण्यात आला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २३ - बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणी ३ नगरसेवकाचा जामिन ठाणे न्यायालयाने आज मंजूर केला आहे. यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांना १५ फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता.
सुधाकर चव्हाण, हणमंत जगदाळे आणि विक्रांत चव्हाण या तिन्ही नगरसेवकांचा जामिन मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येकी एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांनी मंगळवारी सशर्त जामीन मंजूर केला. त्यामुळे तब्बल ७८ दिवसांनंतर त्यांची बुधवारी ठाणे कारागृहातून मुक्तता होणार आहे.
परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून ४ नगरसेवकांना अटक केली होती.
सुरज परमार अत्महत्येचा घटनाक्रम -
बिल्डर सूरज परमार यांनी ७ आॅक्टोंबर २०१५ रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर सूसाईड नोटच्या अहवालाच्या आधारे चारही नगरसेवकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
चौघेही नगरसेवक ५ डिसेंबर रोजी पोलिसांना शरण आले.
५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी २०१६ या ७० दिवसांमध्ये ९ दिवस पोलीस तर उर्वरित ६१ दिवस ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
१५ फेब्रुवारी रोजी नजीब मुल्ला यांना ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला.