बिल्डर्सनी वाचला समस्यांचा पाढा

By admin | Published: May 18, 2016 02:45 AM2016-05-18T02:45:58+5:302016-05-18T02:45:58+5:30

प्रशासन अत्यंत धीम्या गतीने काम करीत असून विकासकामे जवळपास ठप्प झाली आहेत

Builders have problems reading | बिल्डर्सनी वाचला समस्यांचा पाढा

बिल्डर्सनी वाचला समस्यांचा पाढा

Next


नवी मुंबई : नैना परिसरात बांधकाम परवानगी वेळेत मिळत नाही. प्रशासन अत्यंत धीम्या गतीने काम करीत असून विकासकामे जवळपास ठप्प झाली आहेत. येथील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्राधान्यक्रमाने त्या सोडविण्याची मागणी महाराष्ट्र चेंबर्स आॅफ हाऊसिंग इंडस्ट्री (एमसीएचआय)च्या नवी मुुंबई कार्यकारिणीने केली आहे.
एमसीएचआय च्या पदाधिकाऱ्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांची भेट घेतली. यावेळी नैना परिसरातील समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला. २७० गावांचा समावेश नैना मध्ये आहे. तीन वर्षांमध्ये पूर्ण परिसराचा विकास आराखडा तयार करणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात २३ गावांचा विकास आराखडा तयार करण्यातच हा कालावधी संपला असून, अद्याप अंतिम आराखड्याला शासनाची मंजुरी मिळालेली नाही. पहिल्या दीड वर्षात सिडकोने एकाही प्रकल्पाला परवानगी दिली नव्हती. पुढील दीड वर्षात फक्त २९ प्रकल्पांना परवानगी दिली आहे. एमएमआरडीएच्या मुदत संपलेल्या विकास आराखड्याच्या नकाशावर आधारित परवानग्या दिल्या जात आहेत. परंतु त्या आराखड्यामध्ये निवासी झोन फक्त ०.३५ टक्के एवढाच होता. परवानगीच मिळत नसल्याने अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. नियमावली तयार करताना २ ते ६ पट विकास शुल्क आकारले जात आहे. प्रति हेक्टरला २ कोटी ८१ लाख एवढे शुल्क आकारले जात आहे. हा नकाशा तयार करताना ९० टक्के रहिवासी क्षेत्रामध्ये रस्ते, लाइट, पाणी व मलनिस्सारण व्यवस्था करून दिलेली नाही. नैनाच्या विकास आराखड्यावर ३९४६ सूचना व हरकती आल्या होत्या, परंतु या सूचनांकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने त्यांच्या इच्छेप्रमाणे आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला असल्याचेही निदर्शनास आणून दिले.
सिडको कार्यक्षेत्रामध्ये साडेबारा टक्के योजनेअंतर्गतचे भूखंड वाटप थांबविण्यात आले आहे. बांधकाम परवानगी मिळविणे किचकट झाले आहे.
सिडकोने सीआरझेड, मँग्रोव्हजमधील भूखंड बदलून द्यावेत. बांधकाम परवानगीसाठीच्या ना हरकत परवान्यांची संख्या कमी केली जावी. सिडकोमधील अधिकाऱ्यांशी भेटण्याच्या वेळेमध्ये वाढ करावी. अनेक वेळा भेटण्यासाठी दिलेल्या वेळेत अधिकारी जागेवरच नसतात. यामुळे अनेक कामे रखडत असल्याचे यावेळी एमसीएचआयचे चेअरमन अरविंद गोयल यांनी निदर्शनास आणून दिले. गगरानी यांनीही या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी प्रकाश बाविस्कर, विजय लखानी, मनोहर श्रॉफ, सरेंदर अरेंजा, जितेंद्र परमार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Builders have problems reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.