भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

By admin | Published: November 18, 2016 08:52 AM2016-11-18T08:52:12+5:302016-11-18T08:52:58+5:30

चार मजली इमारत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भिवंडीतील गोकुळ नगर परिसरातील समता सोसायटीमधली ही घटना आहे.

The building of the 4-storey building collapsed, the death of one | भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत

भिवंडी, दि. 18 - चार मजली इमारत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भिवंडीतील गोकुळ नगर परिसरातील समता सोसायटीमधली ही घटना आहे. सूर्यराव ही 40 वर्ष जुनी इमारत कोसळून ही दुर्घटना घडली. 
 
गुरुवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. दुर्घटनेनंतर फायर ब्रिगेड आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. यानंतर फायर ब्रिगेडने ढिगा-याखालून एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला.
 
सूर्यराव इमारतीचा काही भाग शेजारी असणा-या इमारतीवरही पडला. यामुळे खबरदारी म्हणून तेथील कुटुंबांनाही घर रिकामी करण्यासाठी सांगण्यात आले. 
 

Web Title: The building of the 4-storey building collapsed, the death of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.