पुण्यात इमारत कोसळली

By admin | Published: November 1, 2014 12:27 AM2014-11-01T00:27:48+5:302014-11-01T00:27:48+5:30

मुंबई-बंगळुरू महामार्गालगत न:हे गावात पितांबर कॉम्प्लेक्स ही सहा मजली इमारत निकृष्ट बांधकामामुळे शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला.

The building collapsed in Pune | पुण्यात इमारत कोसळली

पुण्यात इमारत कोसळली

Next
पुणो : मुंबई-बंगळुरू महामार्गालगत न:हे गावात पितांबर कॉम्प्लेक्स ही सहा मजली इमारत निकृष्ट बांधकामामुळे शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. धोका असल्याचे लक्षात येताच याच तरुणाने इमारतीतील 28 रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोच इमारतीच्या ढिगा:याखाली अडकला होता.
न:हे आणि आंबेगावच्या सीमेवर असलेल्या या इमारतीत 8 कुटुंबे होती. पैकी सहा जण भाडेकरू असून दोघे प्लॅटमालक आहेत. इमारतीच्या एका भागाला तडा गेला होता. शुक्रवारी पहाटे इमारतीच्या काही भागांना हादरे बसले. साखर झोपेत असलेले रहिवासी या हाद:यांनी जागे झाले. भूकंप असेल, असे त्यांना प्रथम वाटले. मात्र आसपासच्या इमारती व्यवस्थित होत्या. त्याचवेळी संदीप दिलीप मोहिते (28) या तरुणाने आरडाओरडा करीत सर्वाना इमारतीबाहेर येण्यास सांगितले. सर्वजण जीवाच्या आकांताने बाहेर पडले. मात्र मोहिते त्याची दुचाकी घेण्यासाठी पार्किगजवळ गेला असताना इमारत कोसळली आणि ढिगा:याखाली अडकला.
यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवांनांना घटनास्थळी पाचारण केल्यानंतर बचाव कार्यास सुरूवात झाली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ढिगा:याखाली अडकलेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात जवानांना यश आले. (प्रतिनिधी)
 
च्माळीण गावावर डोंगर कोसळल्यानंतर ढिगा:यामध्ये कोणी जिवंत आहे काय याचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफने सेन्सरचा वापर केला होता. या उपकरणामुळे ढिगा:याखाली असलेल्या व्यक्तीच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज 
15 फुटांर्पयत ऐकू येतो. तेच उपकरण या इमारत दुर्घटनेतही वापरण्यात आले. मात्र तरुणाचा जीव वाचविण्यात यश आले नाही.
 
दहा गुंठे क्षेत्रत बांधलेल्या या इमारतीचे दोन मजले अनधिकृत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इमारतीचे बांधकाम किशोरभाई वडगामा या व्यावसायिकाने वर्षभरापूर्वीच केले होते. इमारतीच्या भागात पूर्वी खाण होती. या खाणीत मुरूम भरून इमारतीचा पाया उभारण्यात आला असावा. त्यामुळे इमारतीला धोका निर्माण झाल्याची शक्यता महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी व्यक्त केली आहे.
 
बिल्डरला अटक
पितांबर कॉम्प्लेक्स दुर्घटनेप्रकरणी बिल्डर किशोर पितांबर वडनेरा याला पोलिसांनी अटक केली आहे. इमारतीखाली आणखी कुणी अडकले नाही ना याचा शोध घेण्यासाठी ढिगारा उपसण्याचे काम रात्री उशिर्पयत सुरू होते. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा किशोर वडनेरा याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Web Title: The building collapsed in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.