बुलडाणा: महालक्ष्मीच्या साजाने बाजार फुलला
By admin | Published: September 7, 2016 04:01 PM2016-09-07T16:01:22+5:302016-09-07T16:01:22+5:30
‘सोनीयाच्या पावलाने महालक्ष्मी येती घरा...’ हे वाक्य गौरी अर्थात महालक्ष्मीचा सण येताच सर्वांच्याच तोंडी ऐकायला मिळते.
Next
>ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. ७ - ‘सोनीयाच्या पावलाने महालक्ष्मी येती घरा...’ हे वाक्य गौरी अर्थात महालक्ष्मीचा सण येताच सर्वांच्याच तोंडी ऐकायला मिळते. जिल्ह्यात घरोघरी गौरींची अर्थात महालक्ष्मींची स्थापना केली जाते. भाद्रपद महिन्यातील गौरार्इंचे आगमन हा क्षण मांगल्याचा उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा बुलडाणा जिल्ह्यात जोपासली जाते. गुरूवारपासून तीन दिवस गौराईचा उत्सव चालणार असून त्यासाठी बुलडाणा येथील बाजारपेठही महालक्ष्मीच्या साजाने सजली आहे.
महालक्ष्मी अर्थात गौरार्इंचा उत्सव गुरूवापपासून सुरू होत आहे. गुरूवारला गौरी आवाहन म्हणजे गौरीची स्थापना, शुक्रवारला गौरी पूजन व शनिवारला गौरी विसर्जन केले जाणार आहे. या तीन दिवसांच्या उत्सवासाठी सध्या बाजारपेठ सजली असून घराघरात मखर तयार झाले आहेत. काही ठिकाणी मुखवट्यांसोबतच संपूर्ण मुर्तीही तयार केली जाते. मात्र सर्वाधीक मागणी ही मुखवट्यांनाच आहे. महालक्ष्मीचा साज खरेदी करण्यासाठी बाजारपेठेतही गर्दी उसळली आहे. घराघरात महालक्ष्मींच्या स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. मुखवट्यांची सजावट आणि नवीन मुखवटे खरेदीसाठी मूर्तिकारांकडेही गर्दी दिसून येत आहे. हा उत्सव साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. प्रत्येक पिढीत महालक्ष्मींना स्थापना करण्याची वैविध्यता बदलत गेली आहे. एका पिढीकडून दुसºया पिढीकडे हा उत्सव प्रत्येक घरात परंपरेने पुढे सरकतो मात्र साधने नवीन असली तरी आस्था व श्रद्धा तितकीच कायम असल्याचे दिसून येते. महालक्ष्मींच्या जेवणाचा दिवस हा घराघरातील आनंद, उत्साह व मांगल्याचा दिवस असतो, जवळपास विविध प्रकारच्या भाज्या, मिष्टान्नांचा नैवद्य तयार केला जातो. प्रसाद घेण्यासाठीची आमंत्रणे कितीही असली तरी प्रत्येक जण आमंत्रण स्वीकारून महालक्ष्मींच्या दर्शनासाठी तरी हजेरी लावतोच एवढे महत्व महालक्ष्मी अर्थात गौराईच्या सणाला आहे.
नऊवारी साड्यांना मागणी
पारंपरिक पद्धतीप्रमाणे नऊवारी साड्यांना मागणी असून गौरीसाठी शिवलेल्या साड्या सुद्धा बाजारात आलेल्या आहेत. अश्याच पद्धतीच्या पाचवारी साड्या पाहायला मिळतात. महालक्ष्मीसाठी पैजणसुद्ध आहेत. शहारातील मुख्यबाजार पेठेतील गौरीच्या साजावटीसाठी लागणारे दुकान थाटण्यात आली आहे. यात महालक्ष्मीकरीता आभूषणासहित सजावट साहित्य उपलब्ध आहे. अगदी झालरपासून, महिरप फुलांची कमान, फुले, मखर, दागिन्यांपासून ते महालक्ष्मीसमोर पदार्थ व सजावट साहित्य ठेवण्याकरता लागणारे स्टॅण्ड उपलब्ध आहेत