बुलडाणा - शाळेत प्रत्येक शनिवार ‘खादी डे’
By admin | Published: August 30, 2016 04:21 PM2016-08-30T16:21:44+5:302016-08-30T16:21:44+5:30
जी.वी. मेहता नवयुग विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आठवड्यातील दर शनिवारी खादी वापरण्याचा निश्चय केला आहे
Next
>- ऑनलाइन लोकमत
स्वदेशीचे बीजारोपण : शिक्षकांचा पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 30 - स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मदतीचे स्वदेशी आंदोलन महत्वपूर्ण ठरले होते. याच स्वदेशीची महत्व स्वातंत्र्यातही ओळखून देशाला विकसित राष्ट्र करण्याचे हेतून आठवड्यातून एक दिवस ‘खादी दिवस’ ठरवित. खादीचा गणवेश परिधान करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या आवाहनाला येथील जी.वी. मेहता नवयुग विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आठवड्यातील दर शनिवारी खादी वापरण्याचा निश्चय करून तो २७ ऑगस्टपासून अंमलात आणणे सुरु केले आहे. या माध्यमातून सामाजिक बांधीलकी जपण्याचा संस्थेचा निश्चय निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. प्राचार्य शिवाजीराव ठेंग, उपप्राचार्य सुनिल जोशी, पर्यवेक्षक मेधा पांडे, चंद्रकांत जोशी, किरण नगरनाईक यांच्या मार्गदर्शनात अशा सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला. या निर्णयाचे खामगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ.विजयराव देशपांडे, उपाध्यक्ष प्रभाकरराव बुराडे, सचिव महादेवराव भोजने, कोषाध्यक्ष विठ्ठल काळे यांच्यासह सर्व सदस्यांनी कौतुक केले आहे.