Buldhana Bus Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 09:49 AM2023-07-01T09:49:33+5:302023-07-01T09:50:14+5:30

Buldhana Bus Accident : नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

Buldhana Bus Accident : PM Narendra Modi "deeply saddened" by the tragic bus accident in Maharashtra's Buldhana, announces ex-gratia of Rs 2 lakhs each to the next of kin of the deceased and financial assistance of Rs 50,000 each to those injured | Buldhana Bus Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर

Buldhana Bus Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर

googlenewsNext

Buldhana Bus Accident : नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. यानंतर काही क्षणातच तिने पेट घेतला. या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून त्यांनी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांच मदत जाहीर केली आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्यावतीने पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. 

''महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने अतिशय दु:ख झाले. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत मी आहे आणि जखमी लवकर बरे होवोत, अशी  मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे,'' असे नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाखांची मदत दिली जाणार आहे आणि जखमींना ५० हजारांची मदत केली गेली आहे. 



बस विदर्भ ट्रॅव्हल्सची 
विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस नागपूर वरुन पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपूरहून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस पेटली. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या ३३ प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.  

आणखी काही महत्त्वाच्या बातम्या

...तर वाचले असते काही प्राण, समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात!

बुलढाणा बस अपघातस्थळी पालकमंत्री गुलाबराव पाटील रवाना

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघाताचे भयावह फोटो, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results


 

Web Title: Buldhana Bus Accident : PM Narendra Modi "deeply saddened" by the tragic bus accident in Maharashtra's Buldhana, announces ex-gratia of Rs 2 lakhs each to the next of kin of the deceased and financial assistance of Rs 50,000 each to those injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.