बुलडाण्यात शाहीरीतून लेक वाचवाची गूंज!
By admin | Published: October 20, 2016 05:50 PM2016-10-20T17:50:40+5:302016-10-20T17:50:40+5:30
जिल्ह्यातील ६० गावांमध्ये शाहीरांच्या कलापथक मंडळाकडून ह्यबेटी बचाव, बेटी पढावह्ण हे अभियान राबविण्यात येत आहे.
ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा, दि. २० : जिल्ह्यातील ६० गावांमध्ये शाहीरांच्या कलापथक मंडळाकडून ह्यबेटी बचाव, बेटी पढावह्ण हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील मुलांपेक्षा मुलींचा जन्म दर कमी असलेल्या गावांमध्ये शाहीरांच्या शाहीरीतून ह्यलेक वाचवाह्णची गूंज एकायला मिळत आहे.
मुलीला जीव लावा, सन्मान तीचाही व्हावा, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, तसेच आई मला जगू दे, जग पाहु दे आणि मुलगा कुळाचा दिवा असे म्हणती तर, मुलगी दोन्ही कुळांना प्रकाश देणारी पणती असेही म्हणती, अशा आशयगर्भ गिताद्वारे शाहीर बेटी बचाव बेटी पाढावचा प्रचार जिल्ह्यातील गावोगावी करीत आहेत. भारत सरकारच्या सुचना व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने व गीत नाटक प्रभाग पुणेद्वारा आयोजित बेटी बचाव, बेटी पढाव अभियान जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बुलडाणा यांच्या सनियंत्रणात हाती घेण्यात आले आहे.
ज्या गावामध्ये मुलींचा जन्म दर मुलांपेक्षा कमी आहे, अशा जवळपास १२५ गावांपैकी ६० गावात ह्यबेटी बचाव, बेटी पढावह्ण हे अभियान, दर्जेदार शाहीरी कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असलेले समाजभूषण शाहीर डी.आर.इंगळे व औरंगाबादचे शाहीर लक्ष्मण मोकासरे यांच्या जयभवानी कलापथक मंडळाद्वारे राबविण्यात येत आहे. १७ आॅक्टोबरला कोलवड येथे सरपंच कौतीकराव जाधव यांच्या सहकार्याने कलापथकाचा कार्यक्रम घेऊन जिल्ह्यात बेटी बचाव, बेटी पढाव या अभियानास सुरूवात करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमास गावातील महिला व पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभत आहे.
शासकीय योजनांना कलापथकाचा आधार
शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्याकरिता शाहीरांच्या कलापथकमंडळांचा आधार घेण्यात येत आहे. ह्यबेटी बचाव, बेटी पढाव या अभियानाबारोबरच हागणदरीमुक्त गाव, जलयुक्त शिवार, व्यसनमुक्ती, महिला संरक्षण ग्रामस्वच्छता यासारख्या विविध अभियानाची जनजागृती शाहीर मंडळींच्या कलापकातून करण्यात येत आहे.
लेक वाचवासाठी शाहीर पिंजून काढताहेत गावनगाव
बेटी बचाव, बेटी पढाव या अभियानासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ज्या गावामध्ये मुलींचा जन्म दर मुलांपेक्षा कमी आहे, अशा जवळपास १२५ गावांपैकी ६० गावात शासनाने ह्यबेटी बचाव, बेटी पढावह्ण
हे अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता दर्जेदार शाहीरी कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असलेले समाजभूषण शाहीरांच्या कलापथक मंडळाचा सहभाग घेण्यात आला आहे. लेक वाचविण्याचा संदेश देणारे हे अभियान प्रभाविपणे राबविण्यासाठी शाहीर जिल्ह्यातील गावनगाव पिंजून काढत आहेत.
मुलांपेक्षा मुलींचा जन्म दर कमी असलेल्या गावांमध्ये कलापथक मंडळाकडून ह्यबेटी बचाव, बेटी पढाव अभियान राबविण्यात येत आहे. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा ही चळवळ शासकीय पातळीपुरती मर्यादीत न राहता ती लोक चळवळ व्हावी,
याबाबबत शासकनाकडून लोककलावंतांना सहकार्य अपेक्षीत आहे.
- डी.आर.इंगळे, शाहीर,
जयभवानी कलापथकमंडळ, बुलडाणा.