मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट, सरकारने पूर्ण केले 'हे' काम...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 06:41 PM2024-01-08T18:41:47+5:302024-01-08T18:42:00+5:30

Mumbai Ahmedabad Bullet Train: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Bullet Train: Big update on Mumbai-Ahmedabad bullet train, government has completed Land acquisition work | मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट, सरकारने पूर्ण केले 'हे' काम...

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट, सरकारने पूर्ण केले 'हे' काम...

Mumbai Ahmedabad Bullet Train: महाराष्ट्र आणि गुजरातसाठी अतिशय महत्वाचा असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) सोमवारी सांगितले की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 100 टक्के जमीन अधिग्रहण पूर्ण झाली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही 'एक्स' वर जमीन अधिग्रहणाची माहिती दिली.

मुंबई आणि अहमदाबाददरम्यान हाय स्पीड रेल्वे लाइन तयार केली जाता आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्यानुसार, या प्रकल्पासाठी लागणारी 1389.49 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. एनएचएसआरसीएलने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, या प्रकल्पाचे सर्व कॉन्ट्रॅक्ट गुजरात आणि महाराष्ट्राला देण्यात आले होते. तसेच, 120.4 किमी गर्डर सुरू करण्यात आले असून, 271 किमी घाटाचे कास्टिंगही पूर्ण झाले. 

पहिल बोगदा 10 महिन्यांत पूर्ण 
एनएचएसआरसीएल म्हणाले की, गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील जारोली गावाजवळ फक्त 10 महिन्यांत 350 मीटर लांबी आणि 12.6 मीटर व्यासाचा पहिला बोगदा पूर्ण झाला आहे. तसेच, सूरतमध्ये 70 मीटर लांबी आणि 673 मेट्रिक टन वजनाचा पहिला स्टील ब्रिज एनएच 53 वर बांधला गेला असून, अशा 28 पैकी 16 पुल बांधकामांचे काम वेगाने सुरू आहे.

24 पैकी सहा नद्यांवर ब्रिजचे काम पूर्ण 
या प्रसिद्धीपत्रकात असेही म्हटले आहे की, या प्रकल्पांतर्गत 24 नद्यांपैकी सहा नद्यांवर, पार (वालसाड जिल्हा), पूर्णा (नवसारी जिल्हा), मिंधोला (नवसारी जिल्हा), अंबिका (नवसारी जिल्हा), औरंगा (वालसाड जिल्हा) आणि वेंगानिया (नवसारी जिल्हा) पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याशिवाय, नर्मदा, तापी, माही आणि साबरमती नद्यांवरील काम सुरू आहे. 

2022 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार होता
हाय-स्पीड रेल्वे लाइन जपानच्या शिनकॅन्सेन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केली जात आहे. या प्रकल्पाला जपानकडून 88,000 कोटी रुपयांच्या  कर्जासह जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीने अर्थसहाय्य दिले आहे. 2022 पर्यंत 1.10 लाख कोटी रुपयांचा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा होती, परंतु भूसंपादनामुळे वेळ लागला. आता 2026 पर्यंत दक्षिण गुजरातमधील सूरत आणि बिलीमोरा दरम्यान बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

Web Title: Bullet Train: Big update on Mumbai-Ahmedabad bullet train, government has completed Land acquisition work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.