बुलेट ट्रेन २०२१ मध्ये धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:53 AM2017-07-19T00:53:16+5:302017-07-19T00:53:16+5:30

केंद्र सरकारची नागपूर ते मुंबईदरम्यान बुलेट ट्रेन चालविण्याची तयारी सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद याशिवाय दिल्ली-कोलकाता, दिल्ली-अमृतसर, दिल्ली

The bullet train will run in 2021 | बुलेट ट्रेन २०२१ मध्ये धावणार

बुलेट ट्रेन २०२१ मध्ये धावणार

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारची नागपूर ते मुंबईदरम्यान बुलेट ट्रेन चालविण्याची तयारी सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद याशिवाय दिल्ली-कोलकाता, दिल्ली-अमृतसर, दिल्ली-मुंबई, मुंबई-चेन्नई व मुंबई-नागपूर दरम्यान बुलेट ट्रेन चालविण्याच्या प्रकल्पाला केंद्राने तत्त्वत: मंजुरी दिली आहे.
नागपूर ते मुंबई बुलेट ट्रेन २०२१-२२ पासून धावणार आहे. या ट्रेनला चार थांबे प्रस्तावित आहेत. त्यात नाशिक, अकोला व औरंगाबाद आदींचा समावेश आहे. ही ट्रेन नागपूर ते मुंबई हे अंतर साडेचार तासांत पूर्ण करणार आहे. प्रकल्पाचा फिजिबिलिटी अहवाल आॅक्टोबर महिन्यात दिला जाणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हायस्पीड कॉर्पोरेशनने दिल्ली-अमृतसर मार्गावर बुलेट ट्रेन चालविण्याबाबतचा अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. दिल्ली-कोलकाता मार्गाचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे तसेच नागपूर-मुंबई प्रकल्पाचा अहवाल कॉर्पोरेशन तयार करीत आहे. प्राथमिक अहवाल पाठविण्यात आला आहे.

अंतिम प्रस्ताव..
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई-चेन्नई प्रस्तावित बुलेट ट्रेन ही गोवामार्गे चालविली जाणार आहे. ही ट्रेन पुणे, बंगळुरू व तिरुपतीमार्गे चालविण्याचा प्रस्ताव दिला आहे.
याबाबतचा अंतिम प्रस्ताव डिसेंबरपर्यंत सादर केला जाईल, अशी अपेक्षा आहे. नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन हा प्रकल्प विदर्भ व मराठवाडा विभागाचा विकास लक्षात ठेवून राबविला जाणार आहे.

Web Title: The bullet train will run in 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.