बैलगाडी शर्यत पोलिसांनी पाडली बंद
By admin | Published: April 19, 2017 07:23 PM2017-04-19T19:23:59+5:302017-04-19T19:23:59+5:30
वैभववाडीजवळ कोकिसरे नारकरवाडी येथे आयोजित केलेली विनाफटका बैलगाडी स्पर्धा पोलिसांनी अर्ध्यावर बंद पाडली.
Next
प्रकाश काळे / ऑनलाइन लोकमत
वैभववाडी(सिंधुदुर्ग), दि. 19 - वैभववाडीजवळ कोकिसरे नारकरवाडी येथे आयोजित केलेली विनाफटका बैलगाडी स्पर्धा पोलिसांनी अर्ध्यावर बंद पाडली. त्यामुळे प्रेक्षक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची उडाली. गोंधळ घालणाऱ्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. साळुंखे यांनी दिल्यानंतर जमाव शांत झाला.
त्यानंतर आयोजकांना गाडीत कोंबून पोलीस ठाण्यात नेले असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे काहीसा तणाव निर्माण होऊन पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी पोलीस निरिक्षकांच्या दालनात ठाण मांडले आहे. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्याचा निर्णय झाला असला तरी त्याबाबतचा अध्यादेश निघाला नसल्याचे कारण पुढे करुन पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.