पुन्हा एकदा भिर्रर्र..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 06:28 AM2017-07-27T06:28:39+5:302017-07-27T06:28:43+5:30
बैलगाडा शर्यतीवरील बंदीनंरत शर्यतींचे घाट ओस पडले होते. या घाटाच्या दुरुस्तीकडे कोणतेही लक्ष न दोत घाटात अक्षरश: झाडेणुडपे उगवली होती.
मंचर : बैलगाडा शर्यतीवरील बंदीनंरत शर्यतींचे घाट ओस पडले होते. या घाटाच्या दुरुस्तीकडे कोणतेही लक्ष न दोत घाटात अक्षरश: झाडेणुडपे उगवली होती. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीमुळे शर्यतींचा मार्ग मोकळा झाला असून शर्यतींचे घाट पुन्हा गजबजणार आहेत. या घाटात भिर्रर्रर्रची आरोळी पुन्हा घुमणार आहे.
पुन्हा शर्यती सुरू होणार असल्याची बातमी समजताच ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. पेढे वाटून आणि भंडारा उधळून निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
नव्याने शर्यती सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी घाटाच्या दुरुस्तीचे नियोजन केले आहे. कुलदैवत, ग्रामदैवतांच्या यात्रेमध्ये बैलगाडा शर्यती आयोजीत करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यासाठी गावांमध्ये बैलगाडा शर्यतींचे घाट सुरू झाले आहेत. पूर्वी हे घाट पारंपारीक पद्धतीने दगडात बांधलेले असायचे. आता मात्र गावोगाव सुसज्ज घाट बांधण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधींनी त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. गावालगत मोकळ््या जागेत हे शर्यतीचे घाट तयार करण्यात आले होते. पण हिरवा कंदील मिळत नसल्याने शर्यतींना खीळ बसलेली होती.
बैलगाडा शर्यतीवर बंदी आली व तेव्हापासून हे बैलगाडा घाट ओस पडू लागले. बैलगाडे बंद झाल्याने या घाटाकडे कोणी फिरकतही नव्हते. घाट अक्षरश: ओस पडत होते. त्यावर झाडेझुडपे वाढू लागली होती. घाटांची दुरावस्था होवू लागली होती. घाटाची दुरुस्ती करूनही कोणताच उपयोग होणार नव्हात. एरवी हजारो लोकांची उपस्थिती व एकच जल्लोष होणाºया बैलगाडा घाटांची अवस्था न बघण्यासारखी झाली होती.
आता शर्यतींचे घाट पुन्हा गजबजणार आहेत. ग्रामस्थांनी याबाबातचे नियोजन केले आहे. उद्यापासून घाटाची दुरुस्तीयाबाबत पुढाकार घेतला आहे. शर्यतींच्या घाटात पुन्हा भिर्रर्रर्र झाली झाली थालीचा आवाज घुमणार आहे. या घटनांनापुन्हा महत्व येणार असून शर्यतीचे घाटत पुन्हा बैलगाडा शर्यती जोमाने होतील. घाटात चित्तथरारक शर्यती पुन्हा रंगणार आहेत.
पुन्हा होणार रोजगार उपलब्ध
मंचर : बैलगाडा शर्यतीवरील बंदीमुळे गावोगावच्या यात्रांवर परिणाम झाला होता. या यात्रा अक्षरश: ओस पडल्या होत्या. यात्रांवर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली होती. आता त्यांना पुन्हा रोजगार प्राप्त होणार आहे.
पहाडी आवाजात निवेदन करणारे निवेदक यांना काहीच काम राहीले नव्हते. यात्रा पुन्हा सुरू होणार असल्याने व्यावसायीकांना रोजगार उपलब्धहोणार आहे. गावोगावच्या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यती हे मुख्य आकर्षण असते. ग्रामदैवतांच्या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यत ठरलेली असायची. बैलगाडा शर्यतीवरील बंदीचा यात्रांवर परिणाम झाला. यात्रा अगदी ओस पडल्या होत्या. घाटात पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जात होता. बैलगाडा शर्यती सुरू झाल्या तरी त्यासाठी काही नियम व अटी असणार आहेत. जिल्हाधिकाºयांची परवानगी घेणे, घाटात रुग्णवाहिका ठेवणे अशा बºयाच अटी असणार आहेत. त्याचे पालन यात्रा कमिटी व बैलगाडा मालकांना करावे लागणार आहे. परवानगीशिवाय कोणीही यात्रांचे आयोजन करू नका असे आवाहन बैगाडा संघटनांनी केले आहे. बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल आहेत ते मागे घेण्याची मागणी आता पुढे येवू लागली आहे. शर्यतीवरील बंदीमुळे त्याचा परिणाम व्यावसायकांवर होऊन उलाढाल मंदावली होती. यात्रेत हॉटेल, खेळणयची दुकाने, पुजेचे साहित्य अशी छोटी मोठी दुकाने येत होती. त्यांचे व्यवसाय बंद झाले.
मालकांचा जल्लोष
बैलगाडा शर्यतीवरील विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर बैलगाडा मालकांनी एकच जल्लोष केला. गावोगावी भंडारा उधळून फटाक्याची आतषबाजी करत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
बैलगाडा शर्यतीवरील विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्याने बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. सायंकाळी हे वृत्त बैलगाडामालकांना समजताच त्यांनी एकच जल्लोष केला. गावामध्ये भंडारा उधळून फटाक्याची आतषबाजी केली. बैलगाडा शर्यतींना राज्य शासनाने परवानगी दिली होती.
मंचरच्या शिवाजी चौकात बैलगाडा मालक आज जमा झाले होते. त्यांनी भंडाºयाची उधळण केली. फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. यावेळी बैलगाडा संघटनेचे शामसाहेब आरुडे, महेंद्र निघोट, सुहास बाणखेले, विलास थोरात, शांताराम भय्ये, बाबू बोºहाडे, गणेश मोरडे, संतोष मोरडे, नितीन निघोट, बाळासाहेब टेमकर, आनसू निघोट, पिंटू बाणखेले, बन्सी वाळुंज, भरत दाभाडे यांच्यासह बैलगाडा मालक उपस्थित होते.