सिंचन घोटाळ्यातील आरोपींना दणका

By admin | Published: March 24, 2017 01:48 AM2017-03-24T01:48:44+5:302017-03-24T01:48:44+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी सिंचन घोटाळ्यातील ८ आरोपींविरुद्ध दाखल एफआयआर रद्द करण्यास नकार दिला.

Bunch of accused in irrigation scam | सिंचन घोटाळ्यातील आरोपींना दणका

सिंचन घोटाळ्यातील आरोपींना दणका

Next

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी सिंचन घोटाळ्यातील ८ आरोपींविरुद्ध दाखल एफआयआर रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे ७ आरोपींनी अर्ज मागे घेतले, तर एका आरोपीचा अर्ज न्यायालयाने खारीज केला.
आरोपींमध्ये आर. जे. शाह अ‍ॅण्ड कंपनी, मुंबईच्या संचालिका कालिंदी राजेंद्र शाह, तेजस्विनी राजेंद्र शाह, त्यांचे भागीदार डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक विशाल प्रवीण ठक्कर, प्रवीण नाथालाल ठक्कर, जिगर प्रवीण ठक्कर, अरुणकुमार गुप्ता, कार्यकारी अभियंता उमाशंकर वासुदेव पर्वते व विभागीय लेखाधिकारी चंदन तुळशीराम जीभकाटे यांचा समावेश आहे. न्यायालयाने आरोपींवर कोणतीही सक्तीची कारवाई न करण्याचा अंतरिम आदेश कायम ठेवला असून, हा आदेश संबंधित न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यापासून एक महिन्यापर्यंत लागू राहणार आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नऊ जणांवर गुन्हा नोंदविला आहे. जीभकाटे यांचा अर्ज फेटाळण्यात आला, तर अन्य आरोपींनी अर्ज मागे घेतले. प्रकरणावर न्यायमूर्ती रवी देशपांडे व न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्या विशेष न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Bunch of accused in irrigation scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.