नामांकित कंपन्यांच्या जाहिरातींना दणका
By admin | Published: January 12, 2015 03:38 AM2015-01-12T03:38:53+5:302015-01-12T03:38:53+5:30
अॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्डस् कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एएससीआय) ग्राहक तक्रार कौन्सिलकडून नुकत्याच केलेल्या सर्वेक्षण अहवालात १४४ जाहिरातींपैकी ११३ तक्रारींविरोधात दखल घेतली गेली
मुंबई : अॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्डस् कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एएससीआय) ग्राहक तक्रार कौन्सिलकडून नुकत्याच केलेल्या सर्वेक्षण अहवालात १४४ जाहिरातींपैकी ११३ तक्रारींविरोधात दखल घेतली गेली आहे. दखल घेण्यात आलेल्या ११३ जाहिरातींपैकी ६१ जाहिराती वैयक्तिक आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील होत्या; तर त्यापाठोपाठ ३३ जाहिराती शिक्षण क्षेत्रातील होत्या.
आरोग्य आणि वैयक्तिक काळजी उत्पादने किंवा सेवांच्या ५८ जाहिरातदारांच्या जाहिरातीबाबतच्या दाव्यांमध्ये ग्राहक तक्रार कौन्सिलला त्या एकतर गैरसमज करून देणाऱ्या किंवा वैज्ञानिक सबळ नसलेल्या आणि एएससीआयच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आढळल्या. काही आरोग्यसेवा उत्पादने आणि सेवांच्या जाहिरातींनी औषधे आणि जादूटोणाविरोधी कायद्यांचे उल्लंघन केल्याचेही दिसून आले आहे. या जाहिरातींविरोधातील तक्रारींची दखल घेण्यात आली आहे.
ग्राहक तक्रार कौन्सिलला ३३ शैक्षणिक क्षेत्रातील विविध जाहिरातदारांच्या जाहिरातींबाबतचे दावे सिद्ध झाले नसल्याचे आढळले. त्यामुळे एएससीआयच्या अॅडव्हर्टायझिंग आॅफ एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे या जाहिरातींविरोधातील तक्रारी ग्राह्य धरण्यात आल्या. (प्रतिनिधी)